मध्य प्रदेशातील उज्जैनचे खासदार अनिल फिरोजिया यांनी आपल्या मतदारसंघातील विकासासाठी तब्बल ३२ किलो वजन कमी केले आहे. जेवढे किलो वजन कमी कराल, त्या प्रत्येक किलो वजनावर आपण विकास कामांसाठी 1000 कोटी रुपये देऊ, असे चॅलेन्ज केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी त्यांना दिली होते. यासंदर्भात बोलताना अनिल फिरोजिया म्हणाले, "मी चॅलेन्ज स्वीकारले आणि जवळपास 32 किलोपर्यंत वजन कमी केले.''
...अन् सुरू केली वजन कमी करण्याची तयारी -एएनआय या वृत्तसंस्थेशी संवाद साधताना फिरोजिया म्हणाले, "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फिट इंडिया मोहिमेची सुरूवात केली होती. तेव्हा वजन कमी केल्यास मला उज्जेनच्या विकासासाठी प्रति किलो मागे 1000 कोटी रुपये मिळतील, असे नितीन गडकरी यांनी म्हटले होते. हे मी आव्हान म्हणून स्वीकारले आणि 32 किलो वजन कमी केले. आता मी आणखी वजन कमी करणार आणि त्यांना दिलेल्या आश्वासनाप्रमाणे आणखी निधी देण्यास सांगणार." एढेच नाही, तर "मी वजन कमी केल्यास उज्जैनला अधिक बजेट मिळत असेल, तर मी त्यासाठी फिटनेसवर अधिक लक्ष देण्यास तयार आहे," असेही फिरोजिया म्हणाले.
वजन कमी करण्यासाठी काय-काय केले? -फिरोजिया यांनी आपण वजन कमी करण्यासाठी काय काय केले यासंदर्भातही सांगितले. खासदार खिरोजिया म्हणाले, "मी पहाटे 5.30 वाजता उठतो आणि मॉर्निंग वॉकला जातो. मॉर्निंग वॉकमध्ये धावणे, व्यायाम आणि योगा यांचा समावेश आहे. मी आयुर्वेदिक आहार चार्ट फॉलो करतो. हलका नाश्ता घेतो. लंच आणि डिनरमध्ये सलाड, हिरव्या भाज्या, मिक्स धान्यांची चपातीचा समावेश आहे. मी कधी कधी गाजराचे सूप घेतो आणि ड्रायफ्रुट्स देखील खातो."
अनिल फिजोरिया म्हणाले, 'मी वजन कमी केल्यानंतर, नितिन गडकरी यांना भेटलो आणि त्यांच्यासोबत यासंदर्भात बोललो. ते अत्यंत आनंदी झाले. आश्वासन म्हणून त्यांनी उज्जेनसाठी 2300 कोटी रुपयांच्या विकास कामांनाही मंजुरी दिली आहे.'
काय म्हणाले होते गडकरी? -नितिन गडकरी याच वर्षी उज्जेन येथील एका सभेत बोलताना म्हणाले होते, "मी फंड जारी करण्यासाठी अनिल फिरोजिया यांच्यासमोर एक चॅलेन्ज ठेवले आहे. कधीकाळी माझे वजन 135 किलो होते. हे फिरोजिया यांच्यापेक्षाही अधिक होते. मात्र, आता ते 93 वर आले आहे. मी त्यांना माझा जुना फोटोही दाखवला होता. त्या फोटोत मला ओळखू शकणेही अवघड आहे. मी प्रति किलो वजन कमी केल्यास त्यांच्या मतदारसंघासाठी 1000 कोटी रुपये देईन."