"नवज्योतसिंग सिद्धूंनी कायमचं मौन पाळलं तर काँग्रेसला आणि देशाला शांतता मिळेल"; भाजपाचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2021 12:07 PM2021-10-10T12:07:29+5:302021-10-10T12:11:16+5:30

Navjot Singh Sidhu And Anil Vij : लखीमपूर हिंसाचारातील आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी नवज्योतसिंग सिद्धू यांनी मौन व्रत पाळलं होतं. यावरून हरियाणाचे आरोग्य मंत्री अनिल विज यांनी त्यांना सणसणीत टोला लगावला

anil vij taunt on sidhu said if he observes permanent silence then both congress and country will get peace | "नवज्योतसिंग सिद्धूंनी कायमचं मौन पाळलं तर काँग्रेसला आणि देशाला शांतता मिळेल"; भाजपाचा टोला

"नवज्योतसिंग सिद्धूंनी कायमचं मौन पाळलं तर काँग्रेसला आणि देशाला शांतता मिळेल"; भाजपाचा टोला

Next

नवी दिल्ली - एकीकडे पंजाब विधानसभा निवडणुकीसाठी अन्य पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली असली, तरी दुसरीकडे काँग्रेस मात्र अंतर्गत वाद मिटवण्यासाठी धडपडताना दिसत असल्याचे पाहायला मिळत आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा मागे न घेण्याबाबत नवज्योत सिंग सिद्धू ठाम आहेत. याच दरम्यान लखीमपूर हिंसाचारातील आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी नवज्योतसिंग सिद्धू (Navjot Singh Sidhu) यांनी मौन व्रत पाळलं होतं. यावरून हरियाणाचे आरोग्य मंत्री अनिल विज (Anil Vij) यांनी त्यांना सणसणीत टोला लगावला आहे. "नवज्योतसिंग सिद्धू यांनी जर कायमचं मौन पाळलं तर काँग्रेस आणि देशाला खूप शांतता मिळेल" असं म्हटलं आहे. 

"काँग्रेस हे एक जहाज आहे जे बुडणार आहे" 

"नवज्योतसिंग सिद्धू यांनी मौन व्रत पाळलं आहे. जर त्यांनी हे मौन व्रत कायमचं पाळलं तर काँग्रेसलाही खूप शांतता मिळेल आणि देशालाही" असं म्हणत अनिल विज यांनी टीकास्त्र सोडलं आहे. तसेच "काँग्रेस हे एक जहाज आहे जे बुडणार आहे" अशी बोचरी टीका देखील केली आहे. "काँग्रेसमध्ये कलह आहेत. जेव्हा एखादं जहाज बुडायला लागतं तेव्हा ते डगमगू लागतं. त्याचप्रमाणे, काँग्रेस देखील पुन्हा पुन्हा डगमगत आहे. याचवरून स्पष्ट होत आहे की, काँग्रेसचं जहाज बुडणार आहे" असं अनिल विज यांनी म्हटलं आहे. 

"राज्यातील शेतकरी खूप हुशार"

हरियाणातील शेतकऱ्यांचं कौतुक करताना अनिल विज यांनी "राज्यातील शेतकरी खूप हुशार आहेत. हरियाणाच्या शेतकऱ्यांना व्यवस्थित ठाऊक आहे की पिकांचे अवशेष जाळल्याने पर्यावरणाचं नुकसान होतं आणि जमिनीची सुपीकता देखील कमी होते. त्यामुळे हरियाणातील शेतकरी या बाबतीत नेहमी सावध असतात आणि शेतकऱ्यांना सरकारकडून वेळोवेळी याबाबत माहितीही दिली जाते" असं देखील म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

"...तसं झालं नाही तर आम्ही तोंड दाखवण्यालायक राहणार नाही"

मध्यंतरी पंजाबचे नवे मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांनी सिद्धू यांना समजवण्याचे प्रयत्न केले, तरी सिद्धू मात्र नियुक्त्या रद्द करण्याच्या मागणीवर अडून बसल्याचे दिसत आहेत. यातच नवज्योत सिंग सिद्धू यांनी एक ट्विट करत जर तसे झाले नाही, तर आम्ही कोणाला तोंड दाखवण्यालायक राहणार नाही, असे म्हटले आहे. नवज्योत सिंग सिद्धू यांनी एडव्होकेट जनरल यांच्या नियुक्तीवर आक्षेप नोंदवला होता. तसेच कॅबिनेटमध्ये ज्यापद्धतीने पोर्टफोलियोचे वाटप झाले त्यावर सिद्धू समाधानी नव्हते. नव्या कॅबिनेटमध्ये सुखविंदर सिंग रंधावा यांना गृहमंत्री बनवण्यात आले, मात्र सिद्धू आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा याला विरोध होता. यातच आता एक ट्विट करत पुन्हा एकदा नवज्योत सिंग सिद्धू यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. 
 

Web Title: anil vij taunt on sidhu said if he observes permanent silence then both congress and country will get peace

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.