अहमदाबाद : महामार्गावर आणि अन्यत्र होणाऱ्या अपघातांपैकी बऱ्याच अपघाताला जनावरे कारणीभूत असतात. गाय, म्हशीसारखे जनावरे रस्त्यावर बसून असतात आणि रात्रीच्या वेळी ते दिसत नाहीत. गुजरात टेक्नॉलॉजी यूनिव्हर्सिटीच्या तज्ज्ञांनी आता असे एक तंत्रज्ञान बनविले आहे जे रस्त्यांवरील जनावरांबाबत चालकाला अलर्ट देईल. या उपकरणात डॅशबोर्ड कॅमेरा आणि एल्गोरिथम (समस्या सोडविण्याची क्रमबद्ध पद्धती) यांचा समावेश आहे. वाहनाच्या जवळ रोडवर गाय वा अन्य प्र्राणी आहे किंवा नाही याची माहिती या माध्यमातून मिळणार आहे. त्यामुळे असे संकेत मिळाले तर चालकाला वाहनावर नियंत्रण ठेवता येईल. गायीच्या हालचालींच्या विविध परिदृश्यात याची चाचणी घेण्यात आली आहे. गाय आणि तत्सम प्राण्यांचा शोध घेण्यात या उपकरणाला ८० टक्क्यांपर्यंत यश आल्याचा दावा करण्यात येत आहे. रहदारीच्या आणि छोट्या रस्त्यांवर अनेकदा गाय व अन्य प्राणी अडथळा निर्माण करतात. जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार देशात होणाऱ्या अपघातात मृत्युमुखी पडणाऱ्या नागरिकात १५ ते २९ वर्ष वयाच्या तरुणांचे प्रमाण अधिक आहे. अर्थात, रस्त्यावरील अनेक अपघातांना जनावरांचा अडथळा कारणीभूत असतो.
जनावरांमुळे होणारे अपघात टाळणारे तंत्रज्ञान
By admin | Published: April 10, 2017 12:48 AM