शहरं
Join us  
Trending Stories
1
घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ होतील- नितीन गडकरी
2
टँकर अचानक खड्ड्यात! सुदैवानं चालक बचावला, पुण्यातील 'त्या' घटनेमागचं कारण आलं समोर
3
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
4
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
5
लाचखोर वनरक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात; पाच हजार रूपयांची लाच भोवली!
6
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
7
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
8
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
9
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
10
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
11
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
12
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
13
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
14
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
15
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
16
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
17
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
18
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
19
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई
20
पुरी जोधपूर एक्सप्रेसमधून पाच लाखांचा सुमारे ३३ किलो गांजा जप्त; अल्पवयीन आरोपी जेरबंद

छोट्या कपड्यांमुळे मुले उत्तेजित होतात, अत्याचाराच्या घटनेवर काय म्हणाले अनिरुद्धाचार्य?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2024 1:03 PM

कोलकाता येथे माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली.

कोलकाता येथे ट्रेनी महिला डॉक्टरवर झालेला अत्याचार आणि हत्या ही घटना ताजी आहे. देशातील इतरही राज्यांमध्ये अशा घटनांमध्ये वाढ होत आहे. दिवसेंदिवस वाढत चाललेल्या या घटनांमुळे महिलांची सुरक्षा, कायदा सुव्यवस्थेबद्दल प्रश्न उपस्थित केला जात आहे. कोलकाता येथे माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली. या घटनेने देशभरात खळबळ माजली आहे. विविध क्षेत्रातील दिग्गज मंडळी यावरून रोष व्यक्त करत आहे. कोलकाता येथील कनिष्ठ महिला डॉक्टरवर झालेल्या अत्याचारामुळे देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे. हृदयात धडकी भरवणारी ही घटना कानावर पडताच अंगावर काटा येतो. आर. जी. कार वैद्यकीय महाविद्यालयात ९ ऑगस्ट रोजी ही धक्कादायक घटना घडली अन् एकच खळबळ माजली. सततच्या अत्याचाराच्या घटनांमुळे सर्वत्र संतापाचे वातावरण आहे. 

आता प्रसिद्ध कथावाचक अनिरुद्धाचार्य यांनी याबद्दल आपले मत मांडताना धर्माचा मुद्दा सांगितला. ते म्हणाले की, मला वाटते की, वाईट नजर आणि लहान कपडे या दोन्ही गोष्टींचा दोष असतो. सगळा दोष केवळ नजरेला का द्यायचा असा प्रश्न मला उद्भवतो. मात्र, वाईट नजर बाहेरच्यांवर का पडते या प्रश्नावर त्यांची कोंडी झाली. मग एक उदाहरण देत त्यांनी सांगितले की, एक सुधारलेला व्यक्ती असतो. त्याने एक दिवस कमी कपडे घातलेल्या मुलीला पाहिले. मग तो हळू हळू उत्तेजित होऊ लागला. पुढे तो त्याच्या जवळपास असलेल्या मुलीची छेड काढू लागला. हे लोकांना समजल्यावर त्यांनी त्याला मारहाण केली. मग तुरुंगात जावे लागले. आता मला सांगा तो बिघडला याला कारणीभूत कोण? त्या मुलाची चूक होती हे मान्य करायलाच हवे. पण, आपण ज्या गोष्टी पाहत असतो याचा परिणाम होत असतो हेही तितकेच महत्त्वाचे आहे. ते एका पॉडकास्टला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते. 

"मुलगी म्हणजे एक हिरा असते"दरम्यान, १८ ते ४५ वयोगटातील मुलींवर, महिलांवर अत्याचार झाल्याच्या दुर्दैवी घटना घडत असतात. पण, लहान मुलींवरही अत्याचार कसा काय होऊ शकतो. या कठीण प्रश्नावर व्यक्त होताना अनिरुद्धाचार्य यांनी सावध उत्तर दिले. अश्लील व्हिडीओ, फोटो आणि चित्रपट पाहणे यामुळे तरूणाई भरकटत चालली आहे. मुलगी म्हणजे एक हिरा असते... मुलगा समजून जा की लोखंड असतो त्याला गंज लागला तर थोडीशी किंमत कमी होईल. पण, मुलगी हिरा असल्याने तिचे पावित्र राखण्यासाठी सर्वाधिक बंधने घातली जातात. मुलीला संपूर्ण घर सांभाळावे लागते. त्यामुळे मुलींनी अधिक समजूतदार व्हायला हवे, असे त्यांनी नमूद केले. 

अनिरुद्धाचार्य पुढे म्हणाले की, एक मुलगा असतो तो बाहेर सर्वकाही वाईट कृत्य करायचा. पण, आपल्या घरात आल्यावर त्याच्या बहिणीचा आदर करत असे. यावरून समजते की, त्याच्यात अद्याप धर्म जिवंत आहे. धर्माचे हेच काम असते. ही तुझी बहीण, आई आहे हे धर्म शिकवत असतो. धर्माचे जो पालन करतो तो आपली बहीण आणि बाहेरील स्त्रीमध्ये अंतर पाहत नाही. त्यामुळेच धार्मिक वळणावर जा असे सांगितले जाते. प्रभू रामललामध्ये सर्वांसाठी धर्म होता... रावणामध्ये नव्हता असे म्हणता येणार नाही,पण त्याच्याकडे केवळ त्याच्या बहिणीसाठी धर्म होता. रावणाकडे कमी प्रमाणात धर्मभावना होती आणि प्रभू श्रीरामाकडे व्यापक प्रमाणात ही भावना होती. 

टॅग्स :WomenमहिलाSocial Viralसोशल व्हायरलCrime Newsगुन्हेगारी