खडसेंविरोधात वेगवेगळ्या कोर्टात दावा अंजली दमानिया: दिवसभर कागदपत्रे मिळविण्यासाठी खटपट; एकीकडे क्लिन चिट दुसरीकडे आारोपांच्या फैरी
By admin | Published: June 22, 2016 10:04 PM
जळगाव : माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या विरोधात वेगवेगळ्या प्रकरणात वेगवेगळ्या न्यायालयांमध्ये आपण दावा दाखल करणार असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. बुधवारी दमानिया यांनी शहरातील काही बांधकामे, एमआयडीसीतील प्लॉटची पाहणी करून त्यांची छायाचित्र व कागदपत्रे मिळविली.
जळगाव : माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या विरोधात वेगवेगळ्या प्रकरणात वेगवेगळ्या न्यायालयांमध्ये आपण दावा दाखल करणार असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. बुधवारी दमानिया यांनी शहरातील काही बांधकामे, एमआयडीसीतील प्लॉटची पाहणी करून त्यांची छायाचित्र व कागदपत्रे मिळविली. माजी महसूल, कृषिमंत्री एकनाथराव खडसे यांच्या विरोधातील विविध प्रकरणांवरून चर्चेत आलेल्या मुंबईतील सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया या खडसे यांनी राजीनामा देण्यापूर्वी शहरात आल्या होत्या त्यानंतर त्यांनी मंुबईत केलेले उपोषण, त्यावरून खडसेंना राजीनामा देण्याची आलेली वेळ या प्रकारानंतरच्या खळबळजनक घडामोडीनंतर दमानिया या बुधवारी अचानक जळगावात प्रकटल्या. दिवसभर अनेक ठिकाणी भेटी दमानिया यांनी सकाळपासून अनेक ठिकाणी भेटी दिल्या. - सकाळी मेहरूण परिसरातील बांधकाम व्यावसायिक श्रीकांत व श्रीराम खटोड यांच्या शिरसोली रोडवरील बांधकामांची पाहणी करून छायाचित्रे घेतली. - औद्योगिक क्षेत्रात जाऊन एमआयडीसीतील आमदार डॉ. गुरुमुख जगवाणी यांना दिलेल्या जागेची पाहणी केली. - औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी)च्या कार्यालयात जाऊन जामनेर येथील नियोजित टेक्सटाईल पार्कच्या जागेबाबत कागदपत्रांची मागणी केली-माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या बंगल्या नजीकच्या पूजा अपार्टमेंटची छायाचित्रे घेतली. - सहकार व मुद्रांक शुल्क कार्यालयाकडेही त्या गेल्या होत्या. मात्र कार्यालयात जाणे त्यांनी टाळले. - शहरातील काही राजकीय पदाधिकार्यांच्या जागांबाबतही त्यांनी माहिती घेतली. ------ दमानिया यांच्या पहिल्या भेटीच्या वेळी सामाजिक कार्यकर्ते म्हणून मिरविणार्या काही जणांचा घोळका होता मात्र यावेळी त्यांनी अनेकांना टाळल्याचे दिसून आले. -दमानिया यांच्या सोबत आपचे जिल्ातील नेते डॉ. सुनील गाजरे हेच बर्याच ठिकाणी होते. ---खडसेंविरोधात वेगवेगळ्या ठिकाणी दावामाजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या वेगवेगळ्या प्रकरणांचा वेगवेगळ्या न्यायालयात आपण दावा दाखल करणार असल्याचे दमानिया यांनी यावेळी पत्रकारांना सांगितले. त्या म्हणाल्या, खडसेंनी आपल्या विरोधात १०० कोटींचा अबु्र नुकसानीचा दावा दाखल केला आहे, याप्रश्नी आपण आनंदी (हॅपी) आहोत, त्यास सामोरे जाऊ.