जळगावात येताच पोहोचल्या तापी महामंडळात अंजली दमानिया दोन दिवस मुक्कामी : माहिती मागताच पाटबंधारे विभाग लागला कामाला
By admin | Published: May 25, 2016 10:24 PM
जळगाव : सामाजिक कार्यकर्ती अंजली दमानिया बुधवारी शहरात आल्या आल्या थेट आकाशवाणीनजीकच्या तापी पाटबंधारे महामंडळाच्या कार्यालयात पोहोचल्या. त्यांनी तीन सिंचन प्रकल्प व पुलांची माहिती या विभागात मागितली. आठ मिनिटे त्या तापी महामंडळात होत्या. नंतर ही माहिती मिळण्यासंबंधी त्यांना महामंडळाच्या अधिकार्यांनी गिरणा या जळगाव पाटबंधारे प्रकल्प व लाभक्षेत्र विकास प्राधिकरणच्या इमारतीकडे जाण्याचे सांगितले. दमानिया लागलीच गिरणा कार्यालयात आल्या. ही माहिती मिळावी यासाठी दमानिया रात्री ८.३० वाजेपर्यंत त्या गिरणा कार्यालयात थांबून होत्या.
जळगाव : सामाजिक कार्यकर्ती अंजली दमानिया बुधवारी शहरात आल्या आल्या थेट आकाशवाणीनजीकच्या तापी पाटबंधारे महामंडळाच्या कार्यालयात पोहोचल्या. त्यांनी तीन सिंचन प्रकल्प व पुलांची माहिती या विभागात मागितली. आठ मिनिटे त्या तापी महामंडळात होत्या. नंतर ही माहिती मिळण्यासंबंधी त्यांना महामंडळाच्या अधिकार्यांनी गिरणा या जळगाव पाटबंधारे प्रकल्प व लाभक्षेत्र विकास प्राधिकरणच्या इमारतीकडे जाण्याचे सांगितले. दमानिया लागलीच गिरणा कार्यालयात आल्या. ही माहिती मिळावी यासाठी दमानिया रात्री ८.३० वाजेपर्यंत त्या गिरणा कार्यालयात थांबून होत्या. दुपारचे ४.४६ ची वेळ... एक काळ्या रंगाची फॉर्च्युनर कार तापी महामंडळाच्या कार्यालयात आली... त्यातून सामाजिक कार्यकर्ती अंजली दमानिया व त्यांचे काही शहरातील सहकारी, आप्त उतरले. त्यात डॉ.सुनील गाजरेंसह इतर मंडळी होती. झपझप चालत दमानिया व त्यांचे सहकारी महामंडळच्या कार्यालयात पोहोचले. इथले संचालक आहेत का?कार्यालयात गेल्यावर महामंडळाचे संचालक आहेत का, असे त्यांनी आपल्या सहकार्यांना विचारले. त्यात महामंडळाचे कार्यकारी संचालक व इतर वरिष्ठ नसल्याने त्या कार्यकारी संचालक यांचे स्वीय सहायक प्रकाश ढाके यांच्याकडे गेल्या. माहितीच्या अधिकारात माहिती मागण्याचा उल्लेखढाके यांच्याकडे दमानिया यांनी पद्मालय २, लोअर(निम्न) तापी, कुर्हा वढोदा उपसा योजना आणि तापी नदीवरील पुलांची माहिती मागितली. माहितीच्या अधिकारात प्रथम माहिती मागता येते... ती उपलब्ध करून द्या... नाही तर मी अर्ज करते... आताच माहिती मिळत नसेल तर मला उद्या ती द्या... एकाच ठिकाणी ही सर्व माहिती मिळाली तर चांगले होईल..., असे दमानिया ढाके यांना म्हणाल्या. ढाके यांनी तांत्रिक माहिती हवी की अतांत्रिक असे दमानिया यांना विचारले. त्यावर दमानिया यांनी या प्रकल्पांची किंमत, सुधारित मान्यता, बिले कुठून दिली, शिफारसी, सविस्तर अहवाल... आणखी बरीच माहिती हवी असल्याचे सांगितल्यावर ढाके यांनी तांत्रिक माहिती हवी असल्याने ती जळगाव प्रकल्प मंडळ कार्यालयात मिळेल. आपण गिरणा कार्यालयात गेल्यास योग्य होईल..., असे नम्रपणे दमानिया यांना सांगितले. यानंतर ४.५४ वाजता दमानिया तापी महामंडळाच्या कार्यालयातून निघाल्या आणि अवघ्या दोन ते तीन मिनिटात आपल्या कारने गिरणा कार्यालयात आल्या. गिरणा कार्यालयात जळगाव पाटबंधारे प्रकल्प मंडळात दमानिया पोहोचल्या. या मंडळाचे अधीक्षक अभियंता सं.द.चोपडे यांच्या दालनात त्या गेल्या.