चेन्नई : तामिळनाडूतील चेपॉक मतदारसंघात सत्ताधारी अण्णा द्रमुकचा नेता महिलांना पैसे वाटत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने राज्यात खळबळ उडाली आहे. या व्हिडिओची निवडणूक आयोगाने स्वत: दखल घ्यावी आणि योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी द्रमुकने केली आहे. अण्णा द्रमुकच्या अल्पसंख्यांक विभागाचे नेते बशीर एके ठिकाणी बसून महिलांना प्रत्येकी ५०० रुपये वाटत असल्याचा हा व्हिडीओ आहे. हे ज्या चेपॉक मतदारसंघात घडले आहे, तेथून पूर्वी माजी मुख्यमंत्री व द्रमुकचे दिवंगत नेते एम. करुणानिधी निवडून येत. यंदा तेथून उदयनिधी स्टॅलिन निवडणूक लढवत आहेत. ते करुणानिधी यांचे नातू व स्टॅिलन यांचे पुत्र आहेत. या मतदारसंघात यंदा द्रमुकचा पराभव करायचा, असा चंग अण्णा द्रमुकने बांधला आहे. त्यामुळे तिथे अण्णा द्रमुकतर्फे भरपूर पैसा वाटला जात असल्याचे आरोप होत आहेत. पण त्यातील एक प्रकार कॅमेऱ्यातच टिपला गेल्याने अण्णा द्रमुकचे व भाजपचे नेतेही गप्प आहेत.
तक्रार का करायची?nद्रमुकने मात्र निवडणूक आयोगाने या प्रकाराची स्वत:हून दखल घ्यावी आणि सर्व संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. nतुम्ही या प्रकाराची तक्रार करणार का, असे विचारता द्रमुकचे प्रवक्ते सरवरण अण्णादुराई म्हणाले की, पैसे वाटले जात असल्याचे उघड दिसत असताना पुन्हा आम्ही तक्रार का करावी? कोणी तक्रार करण्याची आयोगाने वाट पाहताच कामा नये.