अण्णा हजारे जोड...उच्च न्यायालयात दाद मागणार : मिलिंद पवार
By admin | Published: January 08, 2016 2:13 AM
पुणे : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे प्रणित भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन न्यास या संस्थेवर प्रशासक नेमण्याच्या धर्मादाय सहआयुक्त शिवकुमार डिगे यांच्या आदेशाविरोधात आम्ही उच्च न्यायालयात दाद मागणार आहोत, अशी माहिती अण्णा हजारे यांचे वकील मिलिंद पवार यांनी दिली़ ॲड़ पवार यांनी सांगितले की, अण्णा हजारे यांच्या संस्थेच्या विरोधात तुर्तास कारवाई करु नये, त्यांना त्यांचे म्हणणे मांडण्याकरीता वेळ देण्यात यावा, असा विनंती अर्ज ४ जानेवारी २०१६ रोजी केला व वेळ दिल्याने कोणाचेही नुकसान होणार नाही़ त्यामुळे तातडीने कुठल्याही प्रकारचे निर्णय अथवा हुकूम करण्याची गरज नाही, असे अर्जात नमूद केले होते़ हा अर्ज सह धर्मादाय आयुक्त यांनी फेटाळून लावत त्याच दिवशी विश्वस्तांना निलंबन केल्याचे व संस्थेवर प्रशासक नियुक्त केल्याचे आदेश केले़ याबाबत नेमके काय आदेश केले, त्
पुणे : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे प्रणित भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन न्यास या संस्थेवर प्रशासक नेमण्याच्या धर्मादाय सहआयुक्त शिवकुमार डिगे यांच्या आदेशाविरोधात आम्ही उच्च न्यायालयात दाद मागणार आहोत, अशी माहिती अण्णा हजारे यांचे वकील मिलिंद पवार यांनी दिली़ ॲड़ पवार यांनी सांगितले की, अण्णा हजारे यांच्या संस्थेच्या विरोधात तुर्तास कारवाई करु नये, त्यांना त्यांचे म्हणणे मांडण्याकरीता वेळ देण्यात यावा, असा विनंती अर्ज ४ जानेवारी २०१६ रोजी केला व वेळ दिल्याने कोणाचेही नुकसान होणार नाही़ त्यामुळे तातडीने कुठल्याही प्रकारचे निर्णय अथवा हुकूम करण्याची गरज नाही, असे अर्जात नमूद केले होते़ हा अर्ज सह धर्मादाय आयुक्त यांनी फेटाळून लावत त्याच दिवशी विश्वस्तांना निलंबन केल्याचे व संस्थेवर प्रशासक नियुक्त केल्याचे आदेश केले़ याबाबत नेमके काय आदेश केले, ते आम्हाला दाखवावे व त्याची सत्यप्रत मिळावी, अशी विनंती केली़ परंतु आजपर्यंत झालेले आदेश कळू दिले नाहीत़ याबाबत झालेल्या आदेशाची माहिती अगोदर माध्यमांना मिळाली़ त्यानंतर अण्णा हजारे, त्यांचे वकिल व विश्वस्तांना समजले़ याविरुद्ध आम्ही उच्च न्यायालयात दाद मागणार आहोत़ ---