टेकचंद सोनवणे/विनोद गोळे नवी दिल्ली : शेतमालाला दीडपट भाव, लोकायुक्तांची नियुक्ती यांच्यासह अनेक मागण्यांसाठी दिल्लीत रामलीला मैदानावर आंदोलनास बसलेले ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी, महाराष्ट्राचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांची भेट नाकारल्याने भाजपाची डोकेदुखी वाढली आहे. अण्णांची प्रकृती सातत्यानेढासळत असल्याने, केंद्र सरकारवरदबाव वाढला आहे.मागण्या मान्य झाल्याचे लेखी आश्वासन दिल्याशिवाय भेटायला येऊ नका, मी त्याशिवाय कुणाशीही चर्चा करणार नाही, असा स्पष्ट संदेश अण्णांनी महाजन यांना पाठविला आहे. त्यामुळे महाजन यांना रविवारी दिल्लीतच ताटकळत थांबावे लागले आहे.भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाने अण्णांची मनधरणी करण्याची जबाबदारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरच सोपविली आहे. दिल्लीतून भाजपाचा एकही नेता अण्णांशी चर्चा करणार नाही. फडणवीस यांनी त्यामुळेच महाजन यांना अण्णांशी चर्चा करण्यासाठी दिल्लीत पाठविले. महाजन यांनी अण्णांना भेटीची वेळ मागितली, परंतु लेखी आश्वासन दिल्याशिवाय भेटू नका, असे सांगत अण्णांनी ती नाकारली. आवश्यक दस्तावेज घेऊन सोमवारी सकाळी ११ वाजता महाजन रामलीला मैदानावर अण्णांना भेटणार असल्याचे समजते.अण्णांमुळे फडणवीस यांची कोंडी झाली आहे. अण्णांना दिल्लीत येण्यापासून परावृत्त करण्याची सूचना भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनी मुख्यमंत्र्यांना केली होती, परंतु फडणवीस त्यात अपयशी ठरले. महाजन यांना ऐन वेळी फडणवीस यांनी दिल्लीला पाठविले. बुधवारपासून सलग चार दिवस सुट्ट्या आहेत. तत्पूर्वी अण्णांची मनधरणी करण्याची जबाबदारी महाजन यांच्यावर आहे.आम्हाला अण्णांविषयी आदर आहे. त्यासाठीच मी दिल्लीत ठाण मांडून बसलो आहे. रविवार असल्याने काही कागदपत्रे जमविण्यात अडचण आली. सोमवार पंतप्रधान नरेंद्र मोदी व अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या भाषणाची प्रत घेऊन अण्णांना भेटणार आहे. शेतकऱ्यांसाठी सरकारने घेतलेल्या सर्व निर्णयांची माहिती अण्णांना देणार आहे. कृषिमूल्य आयोगाच्या सदस्यपदी योग्य व्यक्तींचीच निवड करण्यात आली आहे. त्यात शास्त्रज्ञ, कृषी तज्ज्ञ आहेत, हेसुद्धा अण्णांना सांगणार आहे. -गिरीश महाजनप्रकृतीची धास्ती!मागच्या आंदोलनांच्या तुलनेत यंदा अत्यंत कमी प्रतिसाद मिळाला असला, तरी अण्णा हजारे यांच्या प्रकृतीची भाजपाने धास्ती घेतली आहे. अण्णांची प्रकृती अजून ढासळल्यास, भाजपाला त्याचा फटका बसू शकतो. अण्णांना लोकांचे समर्थन मिळू शकते.मोदींनी वचनपाळले नाहीपंतप्रधान नरेंद्र मोदी हे प्रभू श्रीरामाचे नाव घेतात, पण रामासारखे वचन पाळत नाहीत. त्यांनी सत्तेवर येताना जनतेला अनेक वचने जाहीरनाम्यात दिली, परंतु त्यात एकही काम पूर्ण केले नाही. मोदी यांनी शेतकºयांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्राधान्य दिले पाहिजे.- अण्णा हजारे,ज्येष्ठ समाजसेवकआम्हाला अण्णांविषयी आदर आहे. त्यासाठीच मी दिल्लीत ठाण मांडून बसलो आहे. रविवार असल्याने काही कागदपत्रे जमविण्यात अडचण आली. सोमवार पंतप्रधान नरेंद्र मोदी व अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या भाषणाची प्रत घेऊन अण्णांना भेटणार आहे. शेतकºयांसाठी सरकारने घेतलेल्या सर्व निर्णयांची माहिती अण्णांना देणार आहे. कृषिमूल्य आयोगाच्या सदस्यपदी योग्य व्यक्तींचीच निवड करण्यात आली आहे. त्यात शास्त्रज्ञ, कृषी तज्ज्ञ आहेत, हेसुद्धा अण्णांना सांगणार आहे. -गिरीश महाजन
अण्णांनी भेट नाकारली; भाजपाची डोकेदुखी वाढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2018 5:48 AM