शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : शरद पवारांच्या राष्ट्रवादीला केवळ 10 जागांवरच मानावं लागलं समाधान; कुठे कोण जिंकलं? बघा संपूर्ण लिस्ट
2
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: PM नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्रात १० प्रचारसभा; भाजपासह महायुतीचे किती उमेदवार विजयी झाले?
3
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठी उलथापालथ; शेवटच्या फेरीत काँग्रेसने मारली बाजी
4
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: लाडक्या बहिणींची नारीशक्ती, भीमशक्तीमुळे महायुतीचा ऐतिहासिक महाविजय: रामदास आठवले
5
महाराष्ट्रात भाजपने 148 पैकी 132 जागा जिंकल्याच कशा? काँग्रेसने उपस्थित केला प्रश्न...
6
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “विधानसभा पराभवावर चिंतन करु, जनतेच्या प्रश्नासाठी काँग्रेस काम करत राहील”: नाना पटोले
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : महाराष्ट्रात ओवेसींचं '15 मिनिट'चं राजकारण 'फुस्स'; AIMIM चे 16 पैकी 15 उमेदवार पराभूत
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण ते नवाब मलिक...; या 17 मोठ्या नेत्यांना चाखावी लागली पराभवाची धूळ...!
9
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
10
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
11
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
12
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
13
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
14
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
15
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
16
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
17
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!
18
डमी उमेदवारामुळे रोहित पवारांची सीट आलेली धोक्यात; अखेर कर्जत-जामखेडचा निकाल जाहीर...
19
राज ठाकरेंमुळे आदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...
20
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: महायुतीची त्सुनामी, मविआसह मनसेलाही तडाखा; राज ठाकरेंचे एकाच वाक्यात भाष्य, म्हणाले...

कलम ३७० रद्दची वर्षपूर्ती! विकासाच्या दृष्टीने पावले खुंटलेलीच...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 05, 2020 10:58 AM

काश्मिरमध्ये आजही अनेक सेवा बंद..

ठळक मुद्दे  भविष्यात बदल होण्याची तरूणांना अपेक्षा  

निनाद देशमुखपुणे : दहशतवाद, सातत्याने लादल्या जाणाऱ्या कर्फ्यूमुळे काश्मिरी नागरिक आधिच त्रस्त होता. त्यात ३७० कलम रद्द करत काश्मिर केंद्रशासित प्रदेश बनविण्यात आला. या निर्णयाने वेगाने विकास होईल अशी आश्वासने देण्यात आली. मात्र, वर्षाच्या सुरूवातीला कर्फ्यू आणि त्यानंतर कोरोनामुळे लागलेले लॉकडाऊन यामुळे काहीच झाले नाही. बेरोजगारीचे प्रमाणही वाढले आहे.  येत्या काळात आम्हाला आमचे हक्क मिळतील अशी अपेक्षा काश्मिरी तरूणांनी व्यक्त केली.

५ आॅगस्ट २०१९ ला केंद्रसरकारने एतिहासिक निर्णय घेत जम्मुकाश्मिरचे विभाजन करत दोन नव्या केंद्रशासित प्रदेशांची निर्मिती केली. या निर्णयास अनेक स्थानिकांनी विरोध केला तर काहींनी स्वागत केले. हा निर्णय घेतांना येथील  रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील, उद्योगधंदे येतील, दहशतवाद संपले, तसेच फुटीरतावादी वृत्तींना आळा बसेल असे सांगण्यात आले. हा निर्णय घेतांना सरकारने सुरक्षेच्या दृष्टीने कर्फ्यू लावला. महाविद्यालये शाळा बंद करण्यात आली. या सोबतच इंटरनेट सुविधाही बंद करण्यात आली. दरम्यान टप्याटप्याने हे बंधने उठवण्यात आली. मात्र, काही निर्बंध येथे आजही आहेत. या घटनेला आज एक वर्ष पूर्ण होत आहे. या एका वर्षात ना रोजगार आलेत ना निर्बंध हटले.  

कुपवाडा जिल्ह्यातील जहिद अजिज शेख याने बीकॉम शिक्षण पूर्ण केले आहे. सध्या तो कंत्राटदार आहे. मात्र, गेल्या वर्षभरात येथील नव्या निर्बंधामुळे त्याला कुठलेही नवे कंत्राट मिळालेले नाही. शिवाय अनेक शासकीय कंत्राटांचे आधीचे बीलही थकले असल्याचे त्याने लोकमतशी बोलतांना सांगितले. शाळा महाविद्यालये बंद असल्याने अनेक तरूण बेरोजगार आहेत. यामुळे दहशतवाद्यांकडे तरूण आकर्षित होत आहेत. राज्याच्या दर्जा असतांही या समस्या आमच्या पुढे कायम होत्या. त्या आजही आहेत. राज्याचा दर्जा पूर्वी असल्याने आम्ही आमच्या तक्रारी लोकप्रतिनिधींकडे मांडू शकत होतो. मात्र, आता हा अधिकारही आमच्याकडे राहिलेला नाही.

नाशिक येथे होमीओपॅथीचे शिक्षण घेत असलेली आणि मुळची  अनंतनाग जिल्ह्यातील असलेली नादीया शेख म्हणाली, केंद्रशासीत प्रदेश बनल्याने विकास होईल अशी अपेक्षा आहे. मात्र, सुरवातीला असलेल्या बंदमुळे आणि कोरोनामुळे लागलेल्या लॉकडाऊनमुळे अनेक मर्याचा प्रशासनाला आल्या असतील. येत्या काळात नक्कीच यात बदल होईल अशी आशा आहे.

बीएससी आणि सिव्हील इंजिनिअर असलेला कुपवाडा येथील शौकत अहमद मीर म्हणाला, काश्मिरमध्ये वर्षभरात दोन मतप्रवाह पाहयला मिळाले. एक बाजुने आणि एक विरोधी. नागरिकांना रोजगार असेल तर त्यांना असल्या गोष्टींचा विचार करायला वेळ मिळणार नाही. त्यामुळे प्राधान्यांने रोजगार निर्मिती करायला हवी. सध्या कोरोनामुळे सर्व बंद आहेत. नागरिकांना धान्याचा पुरवठा झाला. पण कामे नसल्याने विरोधाचा सुर वाढतो आहे.

दहशतवाद्यांच्या घटनेत वाढवर्ष भरात अनेक दहशतवाद्यांना कठस्नान घालण्यात आले. लष्कर आणि पोलीसांतर्फे या कारवाया करण्यात आल्या. सुरक्षा रक्षकांना यात यश आले असले तरी दहशतवाद हा दिवसेंदिवस वाढतच आहे......लॉकडाऊमध्ये जे देश भोगतोय ते आम्ही गेल्या अनेक वर्षांपासून पाहतोयकोरोनामुळे संपूर्ण देशात लॉक डाऊन लावण्यात आला आहे. यामुळे नागरिक घरात बंदिस्त झाले आहेत. आता या लॉकडाऊनला विरोध होत आहे. मात्र, कुठल्याही प्रकारची महामारी नसतांना आम्ही गेल्या अनेक वर्षांपासून असे लॉकडाऊन भोगत आलेलो आहे. त्यामुळे संपुर्ण देशाला आमच्यावर काय अत्याचार होत आहे याची प्रचिती आली असेल.- जहिद अजिज शेख, कुपवाडा

 ----पर्यटनही बंददेशाचे नंदवन असलेल्या जम्मु काश्मिरमध्ये पर्यटन हा प्रमुख व्यवसाय आहे. मात्र, कर्फ्यू आणि लॉकडाऊनमुळे हा व्यवसाय गेल्या वर्षभरापासून बंद आहे. यामुळे या ठिकाणी बेरोजगारी वाढली आहे.---

विकासासाठी वाट पाहावी लागेलपाकिस्तानला थेट युद्धात भारताला हरवीने कठीण असल्याने त्यांनी दहशवादाचा स्विकार केला. १९९४पासून येथे दहशतवाद वाढतोय. स्थानिक राजकीय पुढा-यांनीही स्व:ताच्या फायदा बघत येथे विकास होऊ दिला नाही. परिणामी येथील दरी ही दिवसेंदिवस वाढत गेली. लष्कराने दहशतवादाविरोधात मोठी आघाडी या परिसरात घेतली असली तरी दहशतवाद कमी झालेला नाही. येथील तरूणांना या प्रवृत्तींपासूण परावृत्त करणे गरजेचे आहे. केंद्रशासित प्रदेशामुळे विकासाला वाव आहे. एका वर्षात याचे परिणामदिसतील असे म्हणने योग्य होणार नाही. विकासाठी आपल्याला आणखी काही वर्ष वाट पाहावी लागणार आहे.-निवृत्त लेफ्टनंट जनरल अता हसनेन

टॅग्स :PuneपुणेJammu Kashmirजम्मू-काश्मीरArticle 370कलम 370Central Governmentकेंद्र सरकारtourismपर्यटनcorona virusकोरोना वायरस बातम्याTerrorismदहशतवाद