काळा पैसा असलेल्यांची नावे जाहीर करा- आप
By admin | Published: February 10, 2015 12:56 AM
नवी दिल्ली : विदेशात काळा पैसा ठेवणाऱ्यांची नावे जाहीर करा अशी मागणी आम आदमी पार्टीने (आप) केली आहे. नवी नावे जाहीर झाल्यामुळे पक्षाने याबाबत घेतलेल्या भूमिकेवर शिक्कामोर्तब झाले असल्याचे आपचे नेते योगेंद्र यादव यांनी म्हटले. तत्पूर्वी एचएसबीसीच्या अधिकाऱ्यांवर भाजप आणि काँग्रेसने कारवाई केली नसल्याचा आरोप अरविंद केजरीवाल यांनी टिष्ट्वटरवर केला. आपने ९ नोव्हेंबर १२ रोजी जाहीर केलेली नावे नव्या यादीत आहेत. त्यामुळे आमच्या भूमिकेवर शिक्कामोर्तब झाले आहे, असे ते म्हणाले.
नवी दिल्ली : विदेशात काळा पैसा ठेवणाऱ्यांची नावे जाहीर करा अशी मागणी आम आदमी पार्टीने (आप) केली आहे. नवी नावे जाहीर झाल्यामुळे पक्षाने याबाबत घेतलेल्या भूमिकेवर शिक्कामोर्तब झाले असल्याचे आपचे नेते योगेंद्र यादव यांनी म्हटले. तत्पूर्वी एचएसबीसीच्या अधिकाऱ्यांवर भाजप आणि काँग्रेसने कारवाई केली नसल्याचा आरोप अरविंद केजरीवाल यांनी टिष्ट्वटरवर केला. आपने ९ नोव्हेंबर १२ रोजी जाहीर केलेली नावे नव्या यादीत आहेत. त्यामुळे आमच्या भूमिकेवर शिक्कामोर्तब झाले आहे, असे ते म्हणाले. यादीतील अनेकांनी आपली खाती वैध असल्याची कबुली दिली असतानाही सरकारने त्यांची नावे का उघड केली नाही, याबद्दल आपचे नेते प्रशांत भूषण यांनी आश्चर्य व्यक्त केले.--------------------------स्वीस बँकेत बेकायदा खाती नाहीत- अंबानी बंधूंचा दावास्वीस बँकेत बेकायदा खाती असल्याचा इन्कार अग्रणी उद्योपती मुकेश आणि अनिल अंबानी तसेच जेट एअरवेजचे अध्यक्ष नरेश गोयल, अनिवासी भारतीय उद्योगपती स्वराज पॉल यांनी केला आहे.माझ्याकडे काळा पैसा नाही. त्याबद्दल दडवून ठेवण्यासारखे काही नाही. चिंतेची कोणतीही बाब नाही. मी सर्व नियमांचे पालन केले आहे, असे गोयल यांनी दिल्लीत पत्रकारांना सांगितले. रिलायन्स उद्योग किंवा मुकेश अंबानी यांचे जगात कुठेही बेकायदेशीर खाते नाही, असे रिलायन्स उद्योगाच्या प्रवक्त्याने स्पष्ट केले. अनिल अंबानी यांचे एचएसबीसी बँकेत खाते नाही, असे त्यांच्या प्रवक्त्याने म्हटले. इम्मार एमजीएफ आणि डाबर समूहाचे प्रमुख बर्मन यांच्या कुटुंबीयांनी भाष्य टाळले. माझी सर्व बँक खाती कायदेशीर आहेत. मी त्यासाठी जबाबदार आहे. मी सर्व कर पूर्णपणे भरलेला आहे, असे लॉर्ड स्वराज पॉल यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले.---------------------------तपासाची व्याप्ती वाढली- न्या.शाहस्वीस बँकेतील खात्यांबाबत नवी नावे जाहीर झाल्यामुळे तपासाची व्याप्ती वाढली असल्याचे एसआयटीचे प्रमुख न्या.(निवृत्त) एम.बी.शाह यांनी स्पष्ट केले. केवळ वृत्तांच्या आधारावर नव्हे तर सत्य पडताळल्यानंतरच कायदेशीर कारवाई करता येईल. आम्ही सर्वप्रथम दाव्यांची शहानिशा करू त्यानंतर कायदेशीर मार्ग अवलंबला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.------------------------कठोर शिस्तीचे पालन नाही- एचएसबीसीची कबुलीस्वीस बँकेच्या खात्यांमध्ये पैसा जमा करून जागतिक स्तरावर करचोरी केली जात असल्याची माहिती संबंधित खात्यांची माहिती फुटल्यानंतरच बाहेर आली असताना या खात्यांबाबत काही त्रुटी राहिल्या आहेत. शिस्तीचे कठोर पालन झाले नाही, अशी कबुली एचएसबीसी या बँकेने दिल्याचे वृत्त लंडनहून प्राप्त झाले आहे. खासगी स्वीस बँक आणि उद्योगात शिस्तीची संस्कृती तसेच तपासणीचे मापदंड निम्न स्तरावर राहिले असल्याची कबुली या बँकेने एका निवेदनात दिली आहे. अलीकडील काही वर्षांमध्ये सुधारणा करताना नव्या मापदंडांचे सक्तीने पालन करण्यात आले नाही. अटी न पाळणाऱ्या खातेधारकांना बाहेरचा रस्ता दाखविण्यासाठी उल्लेखनीय उपाययोजना केल्या गेल्या नाहीत, असेही या बँकेने म्हटले.