नवनिर्वाचित काँग्रेस खासदाराची घोषणा, गरीब मुलांच्या शिक्षणासाठी देणार संपूर्ण पगार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2019 07:06 PM2019-06-03T19:06:19+5:302019-06-03T19:08:12+5:30
खासदारपदाची शपथ घेताच, एच. वसंतकुमार यांनी आपले खासदारकीचे संपूर्ण वेतन समाजकार्य आणि गरिब मुलांच्या शिक्षणासाठी देणार असल्याचे जाहीर केले.
कन्याकुमारी - तामिळनाडूतील कन्याकुमारी लोकसभा मतदारसंघातून विजयी झालेल्या काँग्रेसखासदाराने आदर्श आणि कौतुकास्पद घोषणा केली आहे. एच. वसंतकुमार असे या खासदाराचे नाव असून ते नानगुनेरी विधानसभा मतदारसंघातून आमदार बनून निवडूण आले होते. मात्र, कन्याकुमारी मतदारसंघातून लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने त्यांना उमेदवारी दिली. वसंतकुमार यांनी 6 लाख 27 हजार मते घेऊन विजय मिळवला.
खासदारपदाची शपथ घेताच, एच. वसंतकुमार यांनी आपले खासदारकीचे संपूर्ण वेतन समाजकार्य आणि गरिब मुलांच्या शिक्षणासाठी देणार असल्याचे जाहीर केले. वसंतकुमार हे दुसऱ्या टप्प्यातील मतदारप्रक्रियेत सर्वात श्रीमंत उमेदवार म्हणून गणले गेले आहेत. वसंतकुमार यांची एकूण संपत्ती 417 कोटी रुपये आहे. तामिळनाडू विधानसभेत आमदार असलेल्या वसंतकुमार यांनी काँग्रेस पक्षाकडून खासदारकीची निवडणूक जिंकत स्वत:चे अस्तित्व सिद्ध केले. या मतदारसंघातून भाजपाने राधाकृष्णन यांना उमेदवारी दिली होती. राधाकृष्णन हे 2014 साली या मतदारसंघातून विजयी झाले होते. त्यावेळी, वसंतकुमार हे क्रमांक दोनचे उमेदवार ठरले होते. मात्र, यावेळी वसंतकुमार यांच्यासमोर राधाकृष्णन यांना पराभव स्विकारावा लागला आहे.
Tamil Nadu: Newly-elected Congress MP from Kanyakumari, H Vasanthakumar, announces that he will donate the salary he'll receive as a parliamentarian to the poor and for education. (File pic) pic.twitter.com/bFaRTKkl1Y
— ANI (@ANI) June 3, 2019