आखाड्यांच्या शाहीस्नानाच्या वेळा जाहीर
By admin | Published: August 27, 2015 12:20 AM
मिरवणूक मार्गही निश्चित : स्नानासाठी ३० मिनिटांचा अवधी
मिरवणूक मार्गही निश्चित : स्नानासाठी ३० मिनिटांचा अवधीनाशिक (प्रतिनिधी) : सिंहस्थ कुंभमेळ्यातील शाहीस्नानासाठी आखाड्यांना देण्यात आलेली वेळ, क्रम आणि शाही मिरवणुकीसाठीचा मार्ग पोलीस प्रशासनाने जाहीर केला आहे. त्यानुसार शाही मिरवणूक लक्ष्मीनारायण मंदिरापासून सुरू होणार असून प्रत्येक आखाड्यांना शाहीस्नानासाठी तीस मिनिटांचा अवधी देण्यात आलेला आहे. सर्व आखाड्यांचे शाहीस्नान सकाळी १० वाजेपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. प्रथम निर्वाणी, दिगंबर आणि निर्मोही या क्रमाने आखाड्यांच्या स्नानांचे नियोजन करण्यात आले आहे. कुंभमेळ्यात येत्या २९ रोजी पहिले शाहीस्नान होणार आहे. तर १३ आणि १८ सप्टेंबर रोजी अनुक्रमे दुसरे आणि तिसरे शाहीस्नान होणार आहे. या तीनही पर्वणीचे नियोजन पोलीस प्रशासनाने केलेले आहे. शाही मिरवणुकीची सुरुवात सकाळी ६ वाजता लक्ष्मीनारायण मंदिर येथून होणार आहे. लक्ष्मीनारायण मंदिर-आग्रारोड तपोवन क्रॉसिंग- जी.टी.टायर-श्रीकृष्ण आईस फॅक्टरी-रामरतन लॉज-काट्या मारुती पोलीस चौकी-ज्ञानेश्वर अभ्यासिके समोरून-गणेशवाडी देवी चौक-गणेशवाडी मनपा शाळा क्रमांक ३० समोरून-आयुर्वेदीक कॉलेज, गाडगे महाराज पुलाच्या डाव्या बाजूने-गौरी पटांगण-गाडगे महाराज पुलाखालून म्हसोबा पटांगण-सरदार चौक-तांबोळी पान स्टॉलच्या मागील बाजूने-गंगाघाट भाजी बाजार मैदानावरून दुतोंड्या मारुतीसमोरून रामकुंड येथे स्नान होईल. शाहीस्नान आटोपल्यानंतर रामकुंड पोलीस चौकी इंद्रकुंड-उजव्या बाजूने पंचवटी कारंजा- निमाणी बस स्टॅँड समोरून उजव्या बाजूने सेवाकुंज- वाघाडी पुलावरून काट्या मारुती चौक उजव्या बाजूने एस.टी. डेपो नं.२ समोरून-संतोष टी पॉइंट-मुंबई आग्रा रोडच्या डाव्या बाजूने-स्वामी नारायण पोलीस चौकी-औरंगाबाद रोडने-ब्राा व्हॅली-तपोवन साधुग्राम येथे शाही मिरवणुकीचे विसर्जन होणार आहे. दोन शाही मिरवणुकीमधील अंतर २०० मीटर असणार आहे. --इन्फो--पहिल्या शाहीस्नानात पहिला मान निर्वाणीलापहिल्या शाहीस्नानात निर्वाणी आखाड्याला पहिला स्नानाचा मान मिळणार आहे. त्यानंतर दिगंवर आणि त्यापाठोपाठ निर्मोही अनी आखाड्यांचे साधू-महंत स्नान करणार आहेत. निर्वाणी आखाड्याची शाही मिरवणूक सकाळी ६ वाजता निघून ७ वाजता रामकुंडावर पोहचेल. दिगंबर आखाड्याची मिरवणूक सकाळी ६.३० वाजता निघून रामकुंडावर ७.३० वाजता पोहचेल तर निर्मोही आखाड्याची मिरवणूक सकाळी ७ वाजता सुरू होऊन ८ वाजता रामकुंडावर पोहचणार आहे. दि. १३ सप्टेंबर रोजी होणार्या दुसर्या शाहीस्नानासाठी पहिला स्नानाचा मान निर्मोही आखाड्याला मिळणार आहे. दुसरा मान दिगंबर आखाड्याला तर तिसरा मान निर्वाणी आखाड्याला मिळेल. पहिल्या शाहीस्नानाच्या वेळेप्रमाणेच दुसर्याही शाहीस्नानाची वेळ असेल. दि. १८ रोजी होणार्या तिसर्या शाहीस्नानाचा पहिला मान निर्मोही आखाड्याला मिळणार आहे. दुसरा मान दिगंबर तर तिसरा मान निर्वाणी आखाड्याला मिळणार आहे.