जिल्ह्यातील ७५० ग्रामपंचायतींच्या मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर
By admin | Published: February 14, 2015 11:52 PM
पुणे:एप्रिल-मे या कालावधीत निवडणूका होणा-या जिल्ह्यातील ७५० ग्रामपंचायतींच्या मतदार यादी तयार करण्याचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. प्रारुप मतदार यादीवर हरकती व सूचना मागवून १४ मार्च रोजी अंतिम मतदार यादी जाहीर करण्यात येणार आहे.
पुणे:एप्रिल-मे या कालावधीत निवडणूका होणा-या जिल्ह्यातील ७५० ग्रामपंचायतींच्या मतदार यादी तयार करण्याचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. प्रारुप मतदार यादीवर हरकती व सूचना मागवून १४ मार्च रोजी अंतिम मतदार यादी जाहीर करण्यात येणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने जुलै ते डिसंेबर २०१५ या कालावधीत मुदत संपणा-या, नव्याने अस्तित्वात आलेल्या ग्रामपंचायतींच्या प्रभाग रचना व आरक्षण सोडतीचा कार्यक्रम नुकतचा जाहीर केला होता. जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या प्रभाग रचना व आरक्षण सोडतीवर २२५ हरकती घेण्यात आल्या होत्या. यावर जिल्हाधिका-यांनी सूनावणी घेऊन १३ फेब्रुवारी रोजी अंतिम प्रभाग रचना व आरक्षण जाहीर केली आहे. आता आयोगाने ग्रामपंचायतींच्या मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. ग्रामपंचायतींसाठी विधानसभा निवडणूकीसाठी वापरण्यात आलेली मतदार यादी ग्राह्य धरण्यात येणार असून, या यादीच्या अधारे ग्रामपंचायतींच्या प्रभागनिहाय मतदार यादी तयार करण्यात येणार आहे. ही प्रभागनिहाय प्रारुप मतदार यादी २६ फेबु्रवारी प्रसिध्द करण्यात येणार आहे. त्यानंतर ५ मार्च पर्यंत प्रारुप मतदार यादीवर हरकती व सूचना मागविण्यात येणार आहेत. यामध्ये प्रामुख्याने यादीत नाव, वय यात असलेल्या चूका, एका प्रभागातील नाव दुस-या प्रभागात जाणे, नवीन मतदार यादी समाविष्ट करणे आदी चूका दुरुस्त करण्यात येणार आहे. त्यानंतर १४ मार्च रोजी ७५० ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी अंतिम मतदार यादी प्रसिध्द करण्यात येणार आहे.जिल्ह्यात प्रभाग रचना व आरक्षणाचा कार्यक्रम जाहीर झालेल्या ग्रामपंचायतींची तालुकानिहाय संख्या पुढील प्रमाणे-बारामती- ५०, भोर-७३, दौंड-५०, हवेली-५७, इंदापूर-६२, जुन्नर-६६, खेड-९२, मावळ-५७, मुळशी-४५, पुरंदर-६६,शिरुर-७३, वेल्हा-३०, आंबेगाव-३०