हरीश गुप्तानवी दिल्ली : केंद्र सरकारने महाराष्ट्रातील १५ शहरांमध्ये १३,५०६ घरांच्या बांधकामांना मंजुरी दिली आहे. या प्रकल्पात ६४३ कोटींची गुंतवणूक असून शहरी गरिबांसाठी परवडणाऱ्या घरांच्या महत्त्वाकांक्षी प्रधानमंत्री आवास योजनेचा (शहरी) हा प्रकल्प एक भाग आहे.महाराष्ट्रात या प्रकल्पावर ६४३ कोटी खर्च केले जाणार आहेत त्यात केंद्राकडून २०१ कोटींचे साह्य मिळेल. गृहनिर्माण व शहरी कामकाज मंत्रालयाने पीएमएवायअंतर्गत शहरी गरिबांसाठी आणखी १.५ लाख परवडणाºया घरांच्या बांधकामाला मंजुरी दिली. त्यासाठी ७ हजार २२७ कोटींची गुंतवणूक होईल. यासाठी केंद्र सरकारकडून २ हजार २०९ कोटी रुपयांचे साह्य मिळणार आहे.नियोजित घरांच्या संख्येसह पीएमएवाय अंतर्गत (यु) एकूण घरे४७,५२,७५१ इतकी होतील.राज्य एकूण शहरे गुंतवणूक घरेआंध्र प्रदेश २२ ३,१८४ कोटी ५६,५१२उत्तर प्रदेश ११० ८७० कोटी २३,००६मध्य प्रदेश ३२ ७३० कोटी १७,९२०झारखंड २६ १,०७५ कोटी १४,५२६छत्तीसगढ ६१ २३४ कोटी ७,६१५राजस्थान ३० २८५ कोटी ६,५७६ओडिशा २० १४५ कोटी ४,८४९पंजाब ४८ ७१ कोटी १,९०९आसाम ६ ३९ कोटी १,५२०
शहरी गरिबांसाठी आणखी १.५ लाख घरांना मंजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 01, 2018 5:05 AM