शहरं
Join us  
Trending Stories
1
हवाई दल प्रमुखपदी एअर मार्शल अमरप्रीत सिंग यांची नियुक्ती; जाणून घ्या, त्यांच्याविषयी...
2
"या तीन घराण्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये दहशत पसरवली" अमित शाहांचा विरोधकांवर हल्लाबोल
3
तिरुमला तिरुपती लाडू वाद: प्रकाश राज यांचा DCM पवन कल्याण यांना मोलाचा सल्ला; म्हणाले...
4
लेडीज टॉयलेटमध्ये कॅमेरा लावला; मुलीने रंगेहाथ पकडला, विद्यार्थ्याला अटक, अनेक व्हिडीओ सापडले
5
ऐश्वर्या-करीश्मादेखील वाचवू शकले नाहीत सुपरस्टारच्या मुलाचं करिअर, आता इंडस्ट्रीतून आहे गायब
6
मोठी बातमी: विधानसभेसाठी वंचितचा धमाका; ११ उमेदवारांची पहिली यादी जाहीर
7
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; विहिरी, शेततळे, वीज जोडणीसाठीच्या अनुदानात वाढ
8
TV वर खूप नाव कमावलं पण मोठ्या पडद्यावर चालली नाही जादू; प्रसिद्ध अभिनेत्याला ओळखलं का?
9
जरांगेंच्या तालावर मुख्यमंत्री नाचतात; ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंची बोचरी टीका
10
IND vs BAN : डोळ्याची पापणी लवण्याच्या आत खेळ खल्लास! यशस्वीनं घेतलेला भन्नाट कॅच बघाच (VIDEO)
11
"काशीचा प्रसाद मिळाला, तेव्हा माझ्या मनात तिरुपतीचा विचार आला", लाडू वादावर माजी राष्ट्रपतींनी व्यक्त केली चिंता
12
IND vs BAN : Rishabh Pant चे झंझावाती शतक! गर्लफ्रेंड ईशाने मानले आभार, म्हणाली...
13
"गोली का जवाब गोले से...!"; गृह मंत्री अमित शाह यांची कश्मिरात गर्जना; विरोधकांवरही निशाणा
14
काय सांगता! ६०० ब्राह्मण करतात तिरुपतीचा प्रसाद; १ लाख लाडू रामलला चरणी केले होते अर्पण
15
LLC 2024 : इरफान पठाणची जादू अन् विजयी सलामी; जुन्या आठवणींना उजाळा, भज्जीचा संघ हरला
16
BSNL नं जिओ, एअरटेल, Vi ला दिला 'जोर का झटका'; एकाच महिन्यात वाढले लाखो ग्राहक
17
'खोसला का घोसला'मधील लोकप्रिय अभिनेत्याचा भीषण अपघात, ICU त उपचार सुरु
18
Leela Palace IPO: पैशांची व्यवस्था करून ठेवा! आता दिग्गज हॉटेल ब्रँडचाही येणार IPO; पाहा डिटेल्स
19
हिज्बुल्लाहची झोप उडवणाऱ्या कंपनीची CEO असणारी ही फिल्मी महिला आहे तरी कोण? 
20
तिरुपती बालाजींवर कुबेराचे ऋण; आजही भाविक फेडतात कर्ज! वाचा, लाडू प्रसादम अद्भूत गोष्टी

राज्यात आणखी ५ स्मार्ट सिटी

By admin | Published: September 21, 2016 6:18 AM

दुसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रातील नागपूर, औरंगाबाद, नाशिक, ठाणे तसेच कल्याण-डोंबिवली या पाच शहरांचा समावेश केला आहे.

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्मार्ट सिटीजच्या महत्त्वाकांक्षी योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रातील नागपूर, औरंगाबाद, नाशिक, ठाणे तसेच कल्याण-डोंबिवली या पाच शहरांचा समावेश केला आहे. एकट्या महाराष्ट्रातीलच पाच राज्ये या यादीत असून, त्यामुळे राज्यातील एकूण सात शहरे स्मार्ट होणार आहेत. पुणे आणि सोलापूरचा याआधीच समावेश झाला आहे. मंगळवारी जाहीर झालेल्या यादीत महाराष्ट्रानंतर उत्तर प्रदेशचा क्रमांक लागतो. तिथे पुढील वर्षी विधानसभा निवडणुका असून, पंतप्रधानांचा मतदारसंघ असलेल्या वाराणसी या शहराबरोबरच आग्रा, अजमेर, कानपूर हीही आता स्मार्ट सिटी योजनेत आली आहेत.मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर व उज्जैन ही शहरेही आता स्मार्ट होणार आहेत, तर सिक्कीममधील नामची शहर स्मार्ट होण्यासाठी निवडले गेले आहे. ओडिशातील राउरकेला व राजस्थानातील कोटा तसेच नागालँडमधील कोहिमा ही शहरेही निवडली गेली आहेत. जम्मू-काश्मीर, प. बंगाल, केरळ, बिहार, हिमाचल प्रदेश, गोवा, आसाम, अरुणाचल प्रदेश, त्रिपुरा, मेघालय, मणिपूर, मिझोरम या राज्यांतील एकाही शहराचा स्मार्ट सिटीच्या तिसऱ्या यादीत समावेश नाही.>गुजरातमधील १ तर पंजाबमधील २ शहरे

गुजरात आणि पंजाबमध्येही पुढील वर्षी विधानसभेच्या निवडणुका होणार असून, पंजाबमधील अमृतसर, जालंधर ही दोन शहरे तर गुजरातमधील एकमेव बडोदा स्मार्ट सिटीजच्या तिसऱ्या यादीत आले आहे. मात्र कर्नाटकातील हुबळी-धारवाड, मंगलोर, टुमकुर, शिमोगा ही शहरेही तिसऱ्या यादीमध्ये आली आहेत. आंध्र प्रदेशातील तिरुपती आणि वेल्लोर तर तामिळनाडूतील सेलम, तंजावूर, मदुराई ही शहरेही आता स्मार्ट सिटीज बनणार आहेत. >66,883 कोटी रुपयांची गुंतवणूक २७ शहरांना स्मार्ट करण्यासाठी करावी लागणार आहे. ही स्मार्ट सिटीजची तिसरी यादी असून, ती घोषित करताना नगरविकासमंत्री व्यंकय्या नायडू म्हणाले की, या यादीमुळे शहरांची संख्या ६0 झाली आहे. 60शहरांना स्मार्ट करण्यासाठी १ लाख ४४ हजार ७४२ कोटी रुपयांची गुंतवणूक आवश्यक आहे. स्मार्ट सिटीसाठी शहर निवडण्याची जी स्पर्धा होते, त्यात कल्याण-डोंबिवली दुसऱ्या क्रमांकावर असून, नागपूर पाचव्या, ठाणे आठव्या, नाशिक दहाव्या आणि औरंगाबाद २५व्या क्रमांकावर आले. स्मार्टच्या पहिल्या यादीत राज्यातील पुणे व सोलापूरचा समावेश होता.

>स्मार्ट सिटी मुद्दे>नाशिकचा आराखडा २१९४ कोटींचाजुन्या नाशिकच्या पुनर्विकासासाठी ३५९.६९ कोटी, ग्रीनफिल्ड अंतर्गत हनुमानवाडी क्षेत्र विकासासाठी ८५५.८९ कोटी रुपये, तर पॅनसिटी अंतर्गत पाणीपुरवठ्यात स्मार्ट मीटर व स्काडा सिस्टीम आणि वाहनतळ व वाहतूक व्यवस्थेसाठी ९७९.०४ कोटी रुपये. क्रिसिल या नामवंत संस्थेने नाशिक महापालिकेचा स्मार्ट सिटीचा आराखडा तयार केला. स्मार्ट सिटीत समावेश झाल्याने प्रामुख्याने पर्यटनाच्या दृष्टीने सांस्कृतिक वारशांचे जतन व विकास करणे, वाइन कॅपिटल म्हणून पर्यटकांना आकर्षित करणे आणि शहराला कॉम्पॅक्ट सिटी म्हणून विकसित करण्याकडे विशेष लक्ष केंद्रित केले जाणार आहे. काही प्रकल्प हे पीपीपी आणि कंपन्यांच्या सीएसआर उपक्रमांतूनही राबविण्याचे प्रस्तावित आहे.>नागपूरचा ३९ हजार कोटींचा प्रस्ताव पर्यावरणास अनुकूल असा विकासउच्च दर्जाचे शिक्षणइलेक्ट्रॉनिक सिटीनद्या सुधारणाट्रान्ससिट ओरिएन्टल डेव्हलपमेंट सुरक्षित शहर>कल्याण-डोंबिवलीचा आराखडा - २०३२ कोटींचापालिका क्षेत्रातील स्टेशन परिसरांचा विकासवाहतूक व्यवस्थेत आमूलाग्र सुधारणाघनकचरा विल्हेवाट प्रकल्पांची उभारणीसर्व सुविधा आयटीशी जोडणे>औरंगाबादचा आराखडा - १७३० कोटींचासार्वजनिक वाहतूक व्यवस्था, रोजगाराला प्राधान्यपर्यटनाला वाव, पर्यटनस्थळी पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणारमहापालिका सभागृह सुरू असतानाच स्मार्ट सिटी समावेशाची बातमी आली. त्यामुळे जल्लोष, अभिनंदनाचा ठराव>ठाण्याचा आराखडा - ६५०० कोटींचा आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पायाभूत सुविधामनोरूग्णालयाच्या जागेत नवे ठाणे स्थानकाची उभारणीमुंबईची मेट्रो ठाण्यात. पुढे डोंबिवली, कल्याण, भिवंडीपर्यंतघनकचऱ्याच्या शास्त्रोक्त विल्हेवाट प्रकल्पांची उभारणी >सोलापूरचा आराखडा - २२४७ कोटींचा१०० कचरा व्यवस्थापनसार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर भरसौरऊर्जा प्रकल्प, रस्ते- उड्डाण पूलजल पूनर्वापर प्रकल्प>पुण्याचा आराखडा ३ हजार कोटींचासार्वजनिक वाहतूक व्यवस्था गतिमान करणे, संपूर्ण शहराला २४ तास पाणी पुरविणे, मल्टीलेवल पार्किंग, वाहतूक नियंत्रण केंद्र आदींचे नियोजन पहिल्या टप्प्यात स्मार्ट सिटीअंतर्गत १४ प्रमुख प्रकल्प कार्यान्वित करण्यात आले आहेत.शहराला २४ तास पाणीपुरवठा उपलब्ध करून देण्यासठी ३५५ ते ३७५ कोटी रूपयांची तरतुद केली आहे, एसटीपी केंद्रातून ऊर्जा निर्मितीसाठी १० कोटी व त्याच्या देखभाल दुरूस्तीसाठी ६५ कोटी अशी ४५० कोटी रूपयांचा खर्च प्रस्तावितबस थांब्याची सुधारणा, बसची देखभाल, बसमधील आयटीएमएस यंत्रणा याकरिता १६० कोटी रूपयांची तरतूद