नवी दिल्ली : देशामध्ये रविवारी कोरोनाचे ९४,३७२ नवे रुग्ण आढळून आले. त्यामुळे या आजाराच्या रुग्णांची एकूण संख्या ४७ लाखांहून अधिक झाली आहे. कोरोनाच्या संसर्गातून आतापर्यंत ३७ लाख जण बरे झाले आहेत. या आजारामुळे आणखी १,११४ जण मरण पावले असून एकूण बळींची संख्या ७८,५८६ झाली आहे.केंद्र्रीय आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीनुसार देशात कोरोना रुग्णांची एकूण संख्या ४७,५४,३५६ असून या आजारातून ३७,०२,५९५ जण बरे झाले आहेत. बरे होणाऱ्यांचे प्रमाण ७७.८८ टक्के आहे. कोरोना रुग्णांचा मृत्युदर १.६५ इतका कमी राखण्यात यश आले आहे. सध्या देशात ९,७३,१७५ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू असून एकूण रुग्णसंख्येच्या तुलनेत हे प्रमाण २०.४७ टक्के आहे. देशात रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून यामुळे निर्माण झालेल्या स्थितीचा आढावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रधान सचिव पी. के. मिश्रा यांनी एका बैठकीत घेतला.पुढील वर्षीच्या सुरुवातीला लस येणार - आरोग्यमंत्रीनवी दिल्ली : कोरोनावरील लस पुढील वर्षीच्या पहिल्या तिमाहीत येईल आणि सुरुवातीला आरोग्य कर्मचारी, ज्येष्ठ नागरिक आणि अन्य काही आजार असलेल्यांना ती प्राधान्याने देण्यात येईल, अशी माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी रविवारी दिली. ते म्हणाले की, लसीची किंमत निश्चित करणे, उत्पादन, त्याचा पुरवठा, ती ठेवण्याची व्यवस्था हे सर्व करावे लागणार आहे.
देशात आणखी ९४,३७२ जणांना कोरोना संसर्गाची लागण, एकूण संख्या ४७ लाखांहून अधिक
By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2020 2:17 AM