कुनो राष्ट्रीय उद्यानातून आणखी एक वाईट बातमी, चित्ता पाण्यात बुडाला; आतापर्यंत १३ चित्त्यांचा झाला मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2024 08:19 PM2024-08-27T20:19:24+5:302024-08-27T20:24:03+5:30

मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानात आणखी एका चित्त्याचा मृत्यू झाला आहे. चित्ता पवनला खुल्या जंगलात सोडण्यात आले. पावसामुळे पाण्याचा मोठा प्रवाह वाहत होता यात चित्त्याचा बुडून मृत्यू झाला.

Another bad news from Kuno National Park, cheetah drowned So far 13 cheetahs have died | कुनो राष्ट्रीय उद्यानातून आणखी एक वाईट बातमी, चित्ता पाण्यात बुडाला; आतापर्यंत १३ चित्त्यांचा झाला मृत्यू

कुनो राष्ट्रीय उद्यानातून आणखी एक वाईट बातमी, चित्ता पाण्यात बुडाला; आतापर्यंत १३ चित्त्यांचा झाला मृत्यू

दक्षिण आफ्रिकेतून मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानात चित्ते आणण्यात आले होते. यापैकी आतापर्यंत १२ चित्त्यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आता आणखी एका चित्त्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. नामिबियन चित्ता पवनचा मृतदेह उद्यानाच्या आत पावसामुळे साचलेल्या पाण्यात पडल्यामुळे झाल्याचे आढळले आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. पाण्यात बुडून पवनचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या त्याचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे. पवनच्या मृत्यूनंतर वनविभागात खळबळ उडाली आहे. काही दिवसांपूर्वी उद्यानात एका शावकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता.

"ममता बॅनर्जींची पॉलीग्राफ टेस्ट करा"; कोलकाता प्रकरणावरून भाजपाचा जोरदार हल्लाबोल

मिळालेल्या माहितीनुसार, चित्ता पवन हा एकमेव नर चित्ता होता ज्याला बंदिशीबाहेर खुल्या जंगलात सोडण्यात आले होते. पवनच्या जंगलातील सर्व हालचालींवर वनविभागाचे अधिकारी लक्ष ठेवून होते. मंगळवारी वनविभागाच्या पथकाने त्याचे लोकेशन ट्रेस करण्याचा प्रयत्न केला असता बराच वेळ पवनची हालचाल दिसून आली नाही. त्यानंतर त्याचा शोध घेण्यात आला.

पावसामुळे नॅशनल पार्कमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे.याच पाण्यात पवनचा मृतदेह झाडाझुडपांमध्ये आढळून आला. अधिकाऱ्यांनी त्याला पाहताच त्याला ताब्यात घेतले, पण त्याची हालचाल पूर्ण बंद होती.  त्याला पाण्याबाहेर काढून तपासणी केली असता पवनचा मृत्यू झाला होता. मुसळधार पावसामुळे नाले, तलाव पूर्णपणे तुडुंब भरल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. पवनला कोणतीही बाह्य दुखापत झाली नसल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. त्यामुळे पवनचा बुडून मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. 

कुनो नॅशनल पार्कमध्ये आतापर्यंत एकूण १३ बिबट्यांचा मृत्यू झाला आहे, यामध्ये ५ शावक आणि ८ वयस्कांचा समावेश आहे. ५ ऑगस्टलाही उपचारादरम्यान एका शावकाचा मृत्यू झाला होता. मादी चित्ता गामिनीने मार्च महिन्यात ६ शावकांना जन्म दिला. तेवढ्यात एका पिल्लाचा मृत्यू झाला होता.

Web Title: Another bad news from Kuno National Park, cheetah drowned So far 13 cheetahs have died

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.