मुंबई: देशात सर्वात आधी सीरमच्या कोविशील्ड लसीला परवानगी मिळाली. सीरमनं ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि ऍस्ट्राझेनेकाच्या सहाय्यानं कोविशील्ड लस तयार केली आहे. देशात सध्या ही लस वापरली जात आहे. त्यानंतर आता सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया लवकरच कोरोनावरील नवीन लस लॉन्च करण्याची शक्यता आहे. याबद्दलचे संकेत खुद्द सीरमचे प्रमुख अदर पुनावाला यांनी दिले आहेत. कोरोना लस सर्वांना मिळेपर्यंत...; बिल अन् मेलिंडा गेट्स यांनी सांगितला पुढचा धोकायंदाच्या वर्षात जून महिन्यात सीरम कोरोनावरील दुसरी लस लॉन्च करेल, अशी माहिती पुनावाला यांनी ट्वट करून दिली आहे. या लसीला मान्य दिल्यास ती देशातील तिसरी कोरोना लस ठरेल. 'सीरमनं नोवावॅक्ससोबतच्या भागिदारीतून तयार केलेल्या लसीच्या चाचण्या सुरू आहेत. त्याचे निष्कर्ष उत्तम आहेत. भारतात चाचण्या सुरू करण्यासाठी आम्ही परवानगी मागितली आहे. जून २०२१ मध्ये कोवोवॅक्स लॉन्च करू अशी आशा आहे,' असं पुनावाला यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.
पहिली रिस्क यशस्वी ठरली! सीरमने केली आणखी एक रामबाण लस आणण्याची तयारी
By कुणाल गवाणकर | Published: January 30, 2021 3:05 PM