नवी दिल्ली : पंजाब नॅशनल बँकेमध्ये नीरव मोदीने केलेल्या १३०००कोटी रुपयांच्या आर्थिक घोटाळा प्रकरणी सीबीआयने गुरुवारी बँकेचा सेवानिवृत्त इंटरनल चीफ आॅडिटर विष्णुव्रत मिश्रा याला अटक केली. २०११ ते २०१५ या काळात पंजाब नॅशनल बँकेच्या मुंबई येथील ब्रॅडी हाऊस शाखेतील आॅडिटची सारी जबाबदारी त्याच्यावर होती. याआधी बँकेच्या अजून एका इंटरनल चीफ आॅडिटरलाही अटक करण्यात आली होती.त्याचप्रमाणे जे सीबीआय कोठडीत आहेत त्यांच्या व्यतिरिक्त अजून १३ जणांची सीबीआयने गुरुवारी चौकशी केली. अटक केलेल्यांच्या चौकशीतून अजून जी माहिती मिळाली त्या आधारे अजून काही ठिकाणी सीबीआयने शोध घेतला.नीरव मोदीला दिलेल्या लेटर आॅफ अंडरटेकिंगशी (एलओयू) संबंधित काही कागदपत्रे सीबीआयने मुंबईतील वडाळा भागातील चाळीत छापा मारुन हस्तगत केली. पंजाब नॅशनल बँकेमधील घोटाळ््यासंदर्भात इंटरनल चीफ आॅडिटर एम. के. शर्मा याला याआधी अटक केली होती. आता मुख्य व्यवस्थापक श्रेणीचा अजून इंटरनल चीफ आॅडिटर विष्णुव्रत मिश्रा यालाही ताब्यात घेण्यात आले आहे. जिथून एलओयू देण्यात आली त्या ब्रॅडी हाऊस शाखेतील आॅडिटची जबाबदारी त्याच्यावर होती. तो आता सेवानिवृत्त झाला होता.>अर्चना भार्गव यांच्यावर गुन्हा दाखलयुनायटेड बँक आॅफ इंडियाच्या माजी प्रमुख अर्चना भार्गव यांच्यावर सीबीआयने बेहिशेबी मालमत्तेचा गुन्हा दाखल केला आहे. @२००४ ते १४ या काळात विविध बँकांमध्ये अनेक उच्चे पदे भूषविताना भार्गव यांनी ४.८९ कोटी रुपयांची संपत्ती जमविली. २.७३ कोटींचे उत्पन्न असताना त्यांनी १.४७ कोटींचा खर्चही केला.
पीएनबीच्या आणखी एका इंटरनल चीफ आॅडिटरला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 02, 2018 3:30 AM