लखनऊ: सलग दोन लोकसभा निवडणुकांमध्ये दारुण पराभव पत्कराव्या लागलेल्या काँग्रेस पक्षामधील घमासान सुरूच आहे. गेल्याच महिन्यात देशभरातल्या काँग्रेसच्या २३ महत्त्वाच्या नेत्यांनी हंगामी अध्यक्षा सोनिया गांधींना पत्र लिहिलं होतं. त्या पत्रामुळे काँग्रेसमध्ये निर्माण झालेलं वादळ अद्यापही शांत झालेलं नाही. त्यातच आता सोनिया गांधींनाउत्तर प्रदेशातल्या पक्षाच्या नेत्यांनी पत्र पाठवलं आहे. गेल्या वर्षी पक्षातून निलंबित करण्यात आलेल्या ९ काँग्रेस नेत्यांनी सोनिया गांधींना पत्र पाठवलं आहे. कुटुंबांच्या मोहातून बाहेर पडून काम करा. अन्यथा पक्ष केवळ इतिहासाचा भाग होईल, अशी रोखठोक भाषा पत्रात वापरण्यात आली आहे. उत्तर प्रदेशात पक्षाची अवस्था अतिशय वाईट आहे. राज्यात काँग्रेसची अवस्था आतापर्यंत कधीच इतकी दयनीय नव्हती, असंदेखील पत्रात नमूद करण्यात आलं आहे. माजी खासदार संतोष सिंह, माजी मंत्री सत्यदेव त्रिपाठी, माजी आमदार विनोद चौधरी, भूधर नारायण मिश्रा, नेकचंद पांडे, स्वयं प्रकाश गोस्वामी आणि संजीव सिंह या नेत्यांची स्वाक्षरी पत्रावर आहे.राष्ट्रवादीला काँग्रेसमध्ये विलीन करा अन् शरद पवारांना अध्यक्ष बनवा; रामदास आठवलेंची सूचनाप्रियंका गांधीवर निशाणाउत्तर प्रदेशच्या प्रभारी आणि काँग्रेस महासचिव प्रियंका गांधी वाड्रा यांच्यावर पत्रातून अप्रत्यक्षपणे निशाणा साधण्यात आला आहे. सोनिया गांधींनी कुटुंबाच्या पलीकडे जाऊन विचार करावा. पक्षातील लोकशाहीची परंपरा पुन्हा जिवंत करावी, असं आवाहन पत्रातून करण्यात आलं आहे."राहुल गांधींनी काँग्रेस अध्यक्ष व्हावं, आम्हाला अजिबात अडचण नाही; पण..."
प्रदेश काँग्रेसमधील नेतेही लक्ष्यराज्यातील पक्षाच्या प्रभारींकडून तुम्हाला सद्यस्थितीची माहिती दिली जात नाही, अशी शंका वाटते. तुम्हाला भेटण्यासाठी आम्ही जवळपास वर्षभरापासून वेळ मागत आहोत. मात्र आम्हाला वारंनवार भेट नाकारली गेली. आम्ही आमच्यावरील निलंबनाच्या कारवाईविरोधात अपील केलं होतं. आमच्यावरील कारवाई अवैध होती. मात्र आमच्या अपीलवर विचार करण्यासही केंद्रीय समितीला वेळ मिळाला नाही, असं नऊ नेत्यांनी पत्रात म्हटलं आहे.