ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 28 - राजधानी नवी दिल्लीतून गुरुवारी हेरगिरीच्या आरोपाखाली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकारी मोहम्मद अख्तर याला अटक करण्यात आल्यानंतर आणखी एका पाकिस्तानी हेराला अटक करण्यात आली आहे. शोएब असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव असून त्याला राजस्थानमधील जोधपूर येथून ताब्यात घेण्यात आले आहे.
याआधी, दिल्लीतून हेरगिरीप्रकरणी मौलाना रमजान आणि सुभाष जांगिड यांनादेखील पोलिसांनी अटक केली. दिल्ली पोलिसांच्या क्राईम ब्रांचने ही कारवाई केली आहे. या दोघांना पटियाला हाऊस कोर्टाने 12 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या दोघांवर अतिशय संवेदनशील माहिती पाकिस्तानी अधिकारी मोहम्मद अख्तरपर्यंत पोहोचवण्याचा आरोप आहे.
दरम्यान, गुरुवारी दिल्ली पोलिसांच्या क्राईम ब्रांचने पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकारी मोहम्मद अख्तरला हेरगिरीच्या आरोपावरुन ताब्यात घेतले होते. या कारवाईनंतर काही वेळाने त्याची सुटका करण्यात आली असून त्याला तातडीने भारत सोडण्यासाठी आदेश देण्यात आले आहेत.
Shoaib visited Pakistan at least six times, his mother and other relatives stay in Pakistan, he has contacts across the border: Delhi Police pic.twitter.com/DzWX9vLgKA— ANI (@ANI_news) October 28, 2016
या पाकिस्तानी अधिका-याकडे भारतीय लष्करासंबंधी अतिशय संवेदनशील आणि गोपनीय माहिती असलेली कागदपत्रं आढळून आली, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. तसेच हा अधिकारी पाकिस्तानातील गुप्तचर यंत्रणांच्या संपर्कात होता, अशी माहितीदेखील समोर आली आहे.
Pakistani spy identified as Shoaib was arrested by Rajasthan police, other 2 spies arrested are Subhash & Ramzan pic.twitter.com/0gxhVTgAdJ— ANI (@ANI_news) October 28, 2016