कानपूर : पंजाब नॅशनल बँकेतील घोटाळ्याचे प्रकरण ताजे असतानाच आणखी घोटाळा समोर आला आहे. रोटोमॅक या कंपनीचे मालक विक्रम कोठारी हे पाच सरकारी बँकांचे ८०० कोटी रुपयांचे कर्ज घेऊन फरार झाले आहेत. विक्रम कोठारी यांनी अलाहाबाद बँक, बँक आॅफ इंडिया, बँक आॅफ बडोदा, इंडियन ओवरसीज बँक आणि यूनियन बँक आॅफ इंडिया या बँकांकडून हे कर्ज घेतले आहे. यूनियन बँकेकडून त्यांनी ४८५ कोटींचे कर्ज घेतले असून अलाहाबाद बँकेकडून ३५२ कोटींचे कर्ज घेतले आहे. वर्षभरापासून त्यांनी व्याज वा मूळ कर्ज परत केलेले नाही. कानपूरमधील मध्यवर्ती भागातील कोठारी यांचे कार्यालय गत आठवड्यापासून बंद आहे. तेव्हापासून कोठारी हे कोठे आहेत याबाबतत माहिती नाही.कंपनीकडून खुलासाअलाहाबाद बँकेचे व्यवस्थापक राजेश गुप्ता म्हणाले की, कोठारीची संपत्ती विक्री करुन ही रक्कम वसूल करता येईल, अशी आम्हाला अपेक्षा आहे. कोठारी यांच्या समूहाचा ४५ वर्षांपासून व्यवसाय आहे.तथापि, रोटोमॅक कंपनीकडून असा खुलासा करण्यातआला आहे की, कोठारी हे कानपूर अथवा भारतातच असतात.या प्रकरणात मार्ग काढण्यासाठी आम्ही बँकांसोबत चर्चा करत आहोत.
आणखी घोटाळा, ‘रोटोमॅक’चे मालक ८०० कोटी घेऊन फरार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2018 1:22 AM