शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
2
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
3
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
4
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
5
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
6
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
7
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
8
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
9
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
10
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
11
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
12
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
13
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
14
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
15
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
16
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
17
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
18
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
19
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...

सपाच्या आणखी एका आमदाराचा राजीनामा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 04, 2017 2:39 PM

उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर समाजवादी पक्षामध्ये आमदारांचं राजीनामा सत्र सुरू झालं आहे.

ठळक मुद्दे उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर समाजवादी पक्षामध्ये आमदारांचं राजीनामा सत्र सुरू झालं आहे.  नुकतंच सपाच्या तीन आमदारांनी राजीनामा दिला होता. आता आणखी एका आमदाराने आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. मेरठच्या आमदार सरोजनी अग्रवाल यांनी पक्षाला राजीनामा देत भाजपची वाट धरली आहे.

लखनऊ, दि. 4- उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर समाजवादी पक्षामध्ये आमदारांचं राजीनामा सत्र सुरू झालं आहे.  नुकतंच सपाच्या तीन आमदारांनी राजीनामा दिला होता. आता आणखी एका आमदाराने आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. मेरठच्या आमदार सरोजनी अग्रवाल यांनी पक्षाला राजीनामा देत भाजपची वाट धरली आहे. सरोजनी अग्रवाल या समाजवादी पार्टीचे वरिष्ठ नेते आजम खान यांच्या जवळच्या मानल्या जातात. रीटा बहुगुणा आणि महेंद्रसिंह हे दोघं सरोजिनी अग्रवाल यांना पक्षात घेऊन आले होते, असं बोललं जातं.  यांच्याशिवाय सपाचे दोन आमदार भाजपामध्ये प्रवेश करू शकतात, अशी माहिती समोर येते आहे. 

बिहार, गुजरातनंतर आता उत्तरप्रदेशमध्ये राजकारणात उलथापालथ सुरु असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. समाजवादी पक्षाच्या विधानपरिषेदतील तीन आणि मायावतींच्या विधानपरिषदेतील एका सदस्याने आमदारकीचा राजीनामा दिला आहे. समाजवादी पक्षातील  बुक्कल नवाब, मधुकर जेटली, यशवंत सिंह या तिघांनी आमदारकीचा राजीनामा दिला आहे. उत्तरप्रदेशात विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर चार महिन्यांनी या घडामोडी घडत आहेत. राजीनामा दिल्यानंतर बुक्कल नवाबने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे कौतुक करुन भाजपामध्ये प्रवेश करण्याचे संकेत दिले आहेत. मार्च महिन्यात उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपाने दणदणीत विजय मिळवला होता. 403 सदस्यांच्या उत्तरप्रदेश विधानसभेत भाजपाचे 300 पेक्षा जास्त आमदार निवडून आले. माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्याबरोबर काम करु शकत नाही. पक्ष एक लढाईचा आखाडा बनला आहे, असं बुक्कल नवाब यांनी राजीनामा दिल्यानंतर सांगितलं. या तीन राजीनाम्यांमुळे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य यांचा विधिमंडळात प्रवेश करण्याचा मार्ग मोकळा झालाह. आदित्यनाथ गोरखपूर येथून तर, मौर्य फुलपूरमधून लोकसभेचे खासदार आहेत. बहुजन समाज पार्टीच्या मायावती यांनी भाजपावर कडाडून टीका केली. भाजपाला सत्तेची भूक असून त्यापायी  त्यांनी सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. मणिपूर, गोवा, बिहार, गुजरात आणि आता उत्तरप्रदेशात जे घडले त्यावरुन भाजपापासून लोकशाहीला धोका असल्याचे सिद्ध होतं असं मायावती म्हणाल्या होत्या.