नवी दिल्ली - सध्या देश कोरोनाच्या मोठ्या संकटाचा सामना करत असतानाच अम्फान आणि निसर्ग चक्रीवादळाचा कहर पाहायला मिळाला. या दोन्ही चक्रीवादळाने जनजीवन विस्कळीत झालं आहे. मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. अनेकांची घरं उद्ध्वस्त झाली तर काहींना आपला जीव गमवावा लागला आहे. याच दरम्यान आता पुन्हा एकदा आणखी एक संकट घोंगावणार असल्याची माहिती मिळत आहे. अम्फान आणि निसर्ग चक्रीवादळानंतर आणखी एका वादळाचा देशाला धोका असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र तयार झालं आहे. हे कमी दाबाचा पट्टा कधीही वादळाचं रूप घेऊ शकतं अशी भीती हवामान खात्याकडून वर्तवण्य़ात आली आहे. त्यामुळे यावर पुढचे 4-5 दिवस हवामान खात्याची (IMD) नजर असणार असून त्यानुसार अलर्ट देण्यात येणार असल्याचं सांगण्यात येत आहे. समुद्रात कमी दाबाचं क्षेत्र तयार होणं म्हणजे हा एखाद्या वादळाचा पहिला टप्पा असतो. जरी या क्षेत्राचं चक्रीवादळात रुपांतर नाही झालं तरी किनाऱ्यालगतच्या परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस होतो. अशात 10 जूनच्या आसपास ओडिशामध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
हवामान खात्याचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुढच्या आठवड्यात हे कमी दाबाचं क्षेत्र ओडिशाच्या दिशेने जाऊ शकतं. कमी दाबाचा पट्टा तयार होणं हा चक्रीवादळाचा एक प्रकार असून तो पहिला टप्पा आहे. त्यामुळे आम्ही त्यावर लक्ष ठेवून आहोत अशी माहिती त्यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेला दिली आहे. गेल्या एका महिन्यातच देशात दोन चक्रीवादळ आले.
पश्चिम बंगाल आणि ओडिशामध्ये पहिलं वादळ आलं. भारताच्या या शतकाचं हे पहिलं सुपर चक्रीवादळ होतं. त्यानंतर वाऱ्याचा वेग कमी झालेला पाहायला मिळाला. मात्र या वादळामुळे बंगाल आणि ओडिशाचं मोठं नुकसान झालं. बंगालमध्ये किमान 80 लोकांचा मृत्यू झाला. यानंतर अरबी समुद्रात पुन्हा कमी दाबाचं क्षेत्र तयार झालं आणि निसर्ग चक्रीवादळाने थैमान घातलं. निसर्ग चक्रीवादळामुळे महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
CoronaVirus News : कोरोनाच्या लढ्यात WHO ने जारी केल्या मास्क संदर्भात नव्या गाईडलाईन्स
धक्कादायक! ...अन् तब्बल 22 वर्षांनंतर पोलिसांनी आरोपींना पकडलं; 'त्या' हत्येचं गूढ उकललं
CoronaVirus News : टक्कल असलेल्या पुरुषांना कोरोनाचा सर्वाधिक धोका; वेळीच व्हा सावध
बापरे! देशात जुलैमध्ये पुन्हा टोळधाड धडकणार, 'या' राज्यांना केलं अलर्ट
CoronaVirus News : खरंच की काय? लॉकडाऊनमध्ये वाया गेलेली वाईन वाचवणार आता लोकांचा जीव; पण कसा...