नवी दिल्ली : दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना स्वयंपाकाच्या गॅसची जोडणी विनामूल्य पुरविण्याच्या ‘प्रधानमंत्री उज्ज्वला योजने’स खास करून ग्रामीण महिलांकडून मिळणारा वाढता प्रतिसाद लक्षात घेऊन, केंद्र सरकारने या योजनेचे उद्दिष्ट ५ कोटींवरून वाढवून ८ कोटी करण्याचा, तसेच यासाठी ४,८०० कोटी रुपयांची वाढीव तरतूद करण्याचा निर्णय मंगळवारी घेतला.केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सुधारित उद्दिष्टानुसार सन २०२० पर्यंत ८ कोटी कुटुंबांना विमानूल्य गॅसची जोडणी देण्याचे ठरविण्यात आले, तसेच ही योजना अनुसूचित जाती व जमातींची सर्व कुटुंबे, प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना व अंत्योदय अन्न योजनेचे लाभार्थी, वनवासी आणि नद्यांमधील बेटांवर राहणाºया लोकांनाही लागू करण्याचे ठरविण्यात आले.यंदा ३ कोटी गॅसच्या जोडण्या दिल्या जायच्या होत्या. आतापर्यंत ३.३६ कोटी जोडण्या दिल्या गेल्या आहेत. आणखी १.३० कोटी अर्ज प्रलंबित आहेत. त्यामुळे ते पूर्ण करण्याची मुदत व त्यासाठीची तरतूद वाढविण्यात आली.
आणखी तीन कोटी कुटुंबांना गॅस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2018 2:51 AM