नवी दिल्ली, दि. 3 - ब्लू व्हेल हा जीवघेणा गेम दिवसेंदिवस आपले जाळे पसरवत असून, त्यामुळे आत्महत्या करणाऱ्यांच्या संख्येत वाढच होत आहे. मध्यप्रदेशात रेल्वेसमोर झोकून देत एका विद्यार्थ्याने आत्महत्या केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मध्यप्रदेशमधील दमोहमध्ये 11 मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थांने धावत्या रेल्वेसमोर येऊन आत्महात्या केली आहे. त्याच्या आत्महत्येचे कारण ब्लू व्हेल गेम आहे. या खेळामध्ये सहभागी होणाऱ्या स्पर्धकाला ५० दिवसांसाठी ५० आव्हाने दिली जातात, ज्यामध्ये शेवटचा टप्पा हा आत्महत्याच आहे. दमोह शहरातील नवजागृती शाळेत शिकणाऱ्या सात्विक उर्फ राम पांडेने आज रात्री उशीरा ट्रेनसमोर येऊन आपला जीव दिला.मृत सात्विकच्या वर्गमित्रांनी सांगितले की, तो ब्लू व्हेल गेम खेळत होता. आत्महात्या करण्यापूर्णी त्यानं इतर मित्रांनाही हा गेम खेळण्याचा आग्रह केला होता. याबाबत सात्विकच्या घरच्यांनी अथावा शाळेतील शिक्षकांनी कोणतीही प्रतिक्रीया दिलेली नाही. पोलिस या घटनेचा तपास करत आहेत. सात्विकचा आत्महत्या करतानाचा सीसीटिव्ही फुटेज समोर आले आहे. त्यामध्ये तो रेल्वे पटरीवर उभा असल्याचे दिसत आहे. त्यावेळी समोरुन ट्रेन त्याला उडवून गेल्याचे दिसतेय.याआधीही देशातील मुलांनी या गेमच्या आहारी जाऊन आपलं आयुष्य संपवलं होते. मागील महिन्यात मुंबईमध्ये एका विद्यार्थ्याने अशाचप्रकारे आत्महत्या केली होती. त्यानंतर पश्चिम बंगालच्या आनंदपूरमध्ये राहणाऱ्या दहावीच्या विद्यार्थ्यानं ब्लू व्हेल गेम खेळाचे टप्पे पार करत आत्महत्या केल्याची भीती वर्तविण्यात येते होती. ब्लू व्हेल या खेळामुळे चीनमध्ये आत्तापर्यंत 100 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली आहे. रशियातून या खेळाचं लोण जगभरात पसरताना दिसतं आहे. रशियात या गेममुळे 200 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. 12 ते 16 या वयोगटातील मुलांकडे असलेल्या स्मार्टफोनमध्ये हा गेम डाऊनलोड करण्याचं प्रमाण आणि या गेममुळे त्यांच्या आत्महत्या होण्याचं प्रमाण जास्त आहे. काही राज्यांमध्ये या गेमवर बंदी आणण्यात आली आहे. मात्र अजूनही त्यामुळे आत्महत्या होत असल्याचे दिसत आहे.काय असते ब्ल्यू व्हेल चॅलेंज?ब्लू व्हेल हा व्हिडीओ गेम असून २0१३ साली रशियात त्याची सुरुवात झाली. तो खेळणाºयाला 50 आव्हाने (चॅलेंजेस) दिली जातात. आव्हाने ५0 दिवसांत पूर्ण करायची असतात. आधी सोपी व नंतर नंतर कठीण आव्हाने दिली जातात. त्यात हाताच्या नसा कापणे, जनावराला मारणे व अंतिम टप्प्यात आत्महत्या करायला सांगणे आदींचा समावेश असतो. प्रत्येक आव्हान पूर्ण केल्यानंतर ते चित्रण गेमच्या क्युरेटरला पाठवायचे असते. अखेर सहभागींना आत्महत्या करण्याचे आव्हान दिले जाते.
ब्लू व्हेलचा आणखी एक बळी ; रेल्वेसमोर झोकून देत विद्यार्थ्याने केली आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 03, 2017 10:00 PM