ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 4 - भारत-पाकिस्तान सीमेवर तणाव असताना पाकिस्तानच्या लष्कराने आणकी एक व्हिडीओ जारी केला आहे. भारतीय लष्कराचे बंकर उडवून भारताच्या 5 जवानांचा खात्मा केल्याचा दावा पाकिस्तानने केला आहे. भारतानमे मात्र, पाकिस्तानचा दावा खोडून काढला आहे. हा व्हिडीओ खोटा असल्याचं भारतीय लष्कराने म्हटलं आहे.
पाकिस्तानी लष्कराचे जनसंपर्क अधिकारी मेजर जनरल आसीफ गफूर यांनी ट्विटर हॅंडलवरून टाकलेल्या या व्हिडीओत भारतीय लष्कराच्या गोळीबाराला प्रत्युत्तरात पाक लष्कराने भारतीय चौक्या उध्वस्त केल्याचा दावा केला आहे. पाक लष्कराने केलेल्या कारवाईत 5 भारतीय जवान मारले गेले तर अनेक जण जखमी झाल्याचा दावाही त्यांनी केला. पण भारताने पाकिस्तानचा हा दावा खोडून काढला आहे. यापुर्वीही पाकिस्तान असाच एक व्हिडीओ प्रसिद्ध केला होता.
13 मे रोजी राजौरी सेक्टरमधील नौशेरातील भारतीय चौक्या उडवल्याचा दावा करणारा व्हिडिओ पाकिस्तानी लष्कराने प्रसिद्ध केला होता. पण हा व्हिडीओ खोटा असून भारतीय चौक्यांना उडवणे अशक्य असल्याचे भारतीय लष्कराने म्हटले होते आहे. भारतीय चौक्यांच्या भिंती भक्कम आहेत. त्या सहजासहजी उद्ध्वस्त करता येणार नाहीत. या व्हिडिओत स्फोट झाल्याचे दिसून येत आहे. पण केवळ आयईडी स्फोटांनीच भारतीय चौक्या उडवणे शक्य आहे. शस्त्रांस्त्रांच्या माऱ्याने हे कदापि शक्य नाही, इतकेच नाही तर या व्हिडिओत अनेक ठिकाणी एडिटिंग केल्याचेही दिसते, असे भारताकडून सांगण्यात आलं होतं.