नवी दिल्ली : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर आणि रणदीप सुरजेवाला यांनी 2013 च्या एका ट्विटचा हवाला देत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. 2013 मध्ये भारत-चीन तणावाशी संबंधित हे ट्विट गुजरातचे मुख्यमंत्री असताना नरेंद्र मोदींनी केले होते. हे ट्विट पुढे करत दोन्ही काँग्रेस नेत्यांनी पंतप्रधानांकडून उत्तर मागितले आहे.
लडाखमध्ये भारतीय लष्कर आपल्या भागातून माघार का घेत आहे, असे 2013 च्या ट्विटमध्ये नरेंद्र मोदी यांनी यूपीए -2 च्या काळात तत्कालीन मनमोहन सिंग सरकारला विचारले होते. त्यावेळी नरेंद्र मोदींनी लिहिले की, 'चीन आपले सैन्य मागे घेत आहे पण मला आश्चर्य वाटते की भारतीय लष्कर आपल्या भूमीवर का मागे हटत आहे? आपण का माघार घ्यावे? '
दरम्यान, प्रत्यक्ष नियंत्रण रेषेत (एलएसी) भारत आणि चीनच्या सैन्य समोरासमोर आले होते, त्यावेळी हे ट्विट नरेंद्र मोदींनी केले होते. दोन्ही देशांनी तणाव कमी करण्याचे मान्य केले आणि लडाखच्या वादग्रस्त भागातून सैन्य मागे घेण्यासाठी सहमती दर्शविली होती. त्यावेळी भारताने म्हटले होते की, 15 एप्रिल 2013 रोजी चिनी सैन्याने 10 किलोमीटर भारतीय हद्दीत घुसखोरी केली होती आणि लडाखच्या देप्सांग खोऱ्यात तळ ठोकला होता.
गेल्या रविवारी अशीच एक घटना घडली, ज्यामध्ये दोन्ही देशांमध्ये तणाव कमी करण्यासाठी सैन्य मागे घेण्याचे मान्य केले. लडाखच्या गलवान खोऱ्यात कोणत्याही बाजूने तणाव निर्माण होऊ नये म्हणून 'नो मेन्स लँड' तयार करण्याची घोषणा करण्यात आली. मे महिन्याच्या सुरूवातीपासूनच दोन्ही देशांचे सैन्य समोरासमोर होते. 15 जून रोजी दोन्ही देशांच्या सैन्यांमध्ये हिंसक चकमक झाली. ज्यामध्ये भारताचे 20 जवान शहीद झाले. तर चीनचेही अनेक सैनिक जखमी झाले. मात्र, त्यांनी कोणतीही अधिकृत आकडेवारी जाहीर केली नाही.
या घटनेवर काँग्रेसने सुरुवातीपासूनच सरकारला घेराव घातला आहे आणि मंगळवारी पक्षाचे नेते शशी थरूर यांनी नरेंद्र मोदी यांचे 2013 च्या ट्विटवा रिट्विट करत म्हटले आहे की, 'मी या प्रकरणात (सैन्य माघार घेण्याच्या) मोदीजींच्या बाजूने आहे. यावर पंतप्रधानांनी उत्तर दिले पाहिजे.'
शशी थरूर यांच्यानंतर काँग्रेसचे नेते रणदीप सुरजेवाला यांनीही ट्वीट करून लिहिले की, "माननीय पंतप्रधान, तुम्हाला तुमचे शब्द आठवतात काय? तुमच्या शब्दांना काही महत्व आहे का? आमचे जवान आमच्या भूमीतून का मागे हटत आहेत? देश याचे उत्तर मागत आहे."
आणखी बातम्या...
मराठा आरक्षणाला अंतरिम स्थगिती देण्याची विरोधकांची मागणी न्यायालयाने फेटाळली - अशोक चव्हाण
"सारथीच्या उद्घाटनाची बिले थकवणाऱ्यांनी संस्था कशी चालवायची ते शिकवू नये"
'त्यांना वाटतंय तसं नाहीय', रोहित पवारांकडून देवेंद्र फडणवीसांना चोख प्रत्युत्तर
घुसखोरी केली नाही, तर चिनी सैन्य माघार कशी घेत आहे? असदुद्दीन ओवेसींचा सवाल
अवघ्या ५ वर्षांच्या दिव्यांगाने १० किमी चालून रुग्णालयासाठी जमवला ९ कोटींचा निधी
Aadhaar-PAN Card Link: आधार-पॅन लिंक करण्याची डेडलाइन वाढवली; आता 'या' तारखेपर्यंत करू शकता