कर्नाटकातील धर्मांतर विरोधी कायदा रद्द...! काँग्रेसनं सत्तेत येताच भाजप सरकारचा निर्णय बदलला
By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2023 06:23 PM2023-06-15T18:23:06+5:302023-06-15T18:23:42+5:30
याशिवाय, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक केशव बळिराम हेडगेवार यांनाही शाळांच्या अभ्यासक्रमातून हटविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
कर्नाटकमध्येकाँग्रेस सत्तेवर येताच धर्मांतर विरोधी कायदा मागे घेण्यात आला आहे. हा कायदा भाजप सरकारने आणला होता. यानंतर आता तेथील काँग्रेस सरकार गोहत्या प्रतिबंधक कायद्यातील कठोर तरतुदीही सौम्य करू शकते, अशी चर्चा आहे. आज झालेल्या सिद्धरमय्या सरकारच्या मंत्रीमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. याशिवाय, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक केशव बळिराम हेडगेवार यांनाही शाळांच्या अभ्यासक्रमातून हटविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
"यासंदर्भात बोलताना, कर्नाटकचे शिक्षणमंत्री मधु बंगारप्पा म्हणाले, 'हेडगेवारांसंदर्भात शाळेच्या अभ्यासक्रमात जे काही देण्यात आले होते, ते काढण्यात आला आहे. गेल्या सरकारने जे काही बदल केले आहेत, ते परत घेण्यात आले आहेत. आता तेच शिकवले जाईल जे यापूर्वी शिकवले जात होते."
याशिवाय कॅबिनेटने आणखी एक निर्णय घेतला आहे, बिगर शासकीय आणि अनुदानित शाळा आणि महाविद्यालयांमध्ये राज्यघटनेची प्रस्तावना वाचणे बंधनकारक असेल.