शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
2
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
3
Maharashtra Election 2024 Live Updates: 'बटेंगे तो कटेंगे' मान्य नसेल तर अजितदादांनी महायुतीतून बाहेर पडावं; काँग्रेस नेत्याचा सल्ला
4
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
5
Maharashtra Vidhan Sabha 2024: 'भाजपच्या बोलण्यातून दिसतेय भेदरलेली स्थिती'; सचिन पायलट यांचा दावा
6
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
7
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
8
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
9
Savner Assembly Election 2024: सख्ख्या भावांच्या लढतीत वहिनी मारणार का बाजी?
10
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
11
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
12
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
13
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
14
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
15
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
16
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
17
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
18
बनावट शस्त्र, परवाना रॅकेटचा अहिल्यानगर पोलिसांकडून पर्दाफाश; जम्मू काश्मिरमध्ये नऊ जणांना अटक
19
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
20
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई

#ModiIsAMistake ! पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या रॅलीपूर्वी विरोधकांची पोस्टरबाजी 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2019 11:02 AM

लोकसभा निवडणूक 2019 चे मिशन डोळ्यासमोर ठेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी वेगवेगळ्या राज्यांमध्ये जाऊन जनसभांना संबोधित करताना दिसत आहेत. उत्तर-पूर्व भागानंतर पंतप्रधान मोदी आता दक्षिण भारताच्या दौऱ्यावर आहेत.

ठळक मुद्देएनडीएमधून तेलुगू देसम पार्टी बाहेर पडल्यानंतर पंतप्रधान मोदींचा पहिल्यांदाच आंध्र प्रदेश दौरा विरोधकांच्या पोस्टरबाजीमुळे राजकीय वातावरण तापलंचंद्रबाबू नायडूंचे कार्यकर्त्यांना गांधीगिरी स्टाईलनं प्रदर्शन करण्याचे आवाहन आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि कर्नाटकात मोदींविरोधात पोस्टरबाजी

नवी दिल्ली - लोकसभा निवडणूक 2019 चे मिशन डोळ्यासमोर ठेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी वेगवेगळ्या राज्यांमध्ये जाऊन जनसभांना संबोधित करताना दिसत आहेत. उत्तर-पूर्व भागानंतर पंतप्रधान मोदी आता दक्षिण भारताच्या दौऱ्यावर आहेत. रविवारी (10 फेब्रुवारी) पंतप्रधान मोदी आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि कर्नाटकच्या दौऱ्यावर आहेत. विशेष म्हणजे एनडीएमधून तेलुगू देसम पार्टी बाहेर पडल्यानंतर पंतप्रधान मोदी यांचा आंध्र प्रदेशचा हा पहिलाच दौरा आहे. या पार्श्वभूमीवर दक्षिणेकडील राजकीय वातावरण तापले आहे. 

आंध्र प्रदेशातील कित्येक शहरांमध्ये पंतप्रधान मोदींविरोधात पोस्टरबाजी करण्यात आली आहे. काही पोस्टर्सवर थेट #NoMoreModi #ModiIsAMistake आणि Modi Never Again असे लिहिण्यात आले आहे. तर दुसऱ्या पोस्टरवर आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू पंतप्रधान मोदी आणि अन्य नेत्यांवर धनुष्य बाणाने निशाणा साधताना दिसत आहेत. दरम्यान, नायडूंनी कार्यकर्त्यांना जाहिररित्या पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याचा गांधीगिरी स्टाइलने विरोध करण्याचे आवाहन केले आहे. यामुळे राज्यामध्ये कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे.

पंतप्रधान मोदींच्या रॅलीला विरोध करण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी आंध्र प्रदेशातील गुंटुर येथे एका रॅलीला संबोधित करणार आहेत. या पार्श्वभूमीवर, मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडूंनी आपल्या कार्यकर्त्यांना शनिवारी(9 फेब्रुवारी) संपर्क साधून मोदींच्या दौऱ्याला गांधीगिरी स्टाइलने विरोध दर्शवण्यास सांगितले आहे. नायडू यांनी आपल्या पार्टीच्या नेत्यांसोबत संवाद साधताना म्हटले की, ''आपल्यासाठी हा काळा दिवस आहे. त्यांनी आंध्र प्रदेशसोबत कसा अन्याय केला आहे, हे पाहण्यासाठी पंतप्रधान मोदी येथे आहेत. मोदी राज्य आणि संवैधानिक संस्थांना कमकुवत बनवत आहेत. राफेल प्रकरणात पीएमओनं हस्तक्षेप करणं हा देशाचा अपमान आहे, असे म्हणते नायडूंनी पिवळे आणि काळे टीशर्ट-फुग्यांसहीत शांततेत मोदींविरोधात निदर्शनं करण्याचे आवाहन केले आहे''.

दरम्यान, आंध्र प्रदेश राज्याला विशेष दर्जा देण्याची मागणी केंद्र सरकारने नाकारल्यानंतर टीडीपीनं एनडीएतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. 

(चंद्राबाबू नायडू यांना एनडीएची दारे बंद : शहा, यू-टर्न करणारे संधिसाधू मुख्यमंत्री)

टॅग्स :Andhra Pradeshआंध्र प्रदेशChandrababu Naiduचंद्राबाबू नायडूNarendra Modiनरेंद्र मोदी