ऑनलाइन लोकमत -
रायपूर, दि. ८ - भारतीय जनता पक्षाचे (भाजपा) नेते आणि छत्तसीगडचे कृषीमंत्री ब्रीजमोहन अग्रवाल यांनी देशविरोधी घोषणा देण्यावरुन केलेल्या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. जर कोणी देशविरोधी घोषणा देत असेल तर त्यांचं तोंड फोडण्याची ताकद आमच्याकडे आहे असं विधान ब्रीजमोहन अग्रवाल यांनी कार्यकर्त्यांशी बोलताना केलं आहे. भाजपा कार्यकर्त्यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.
'जर कोणी भाजपा कार्यकर्त्यांसमोर देशविरोधी घोषणा देत असेल तर त्यांना चोख उत्तर देण्यात आलं पाहिजे. आपल्याकडे त्यांचं तोंड फोडण्याची ताकद आहे. स्वातंत्र्याच्या 69 वर्षानंतरदेखील देशविरोधी घोषणा दिल्या जातात हे दुर्दैवी असल्याचं', ब्रीजमोहन अग्रवाल बोलले आहेत. जर आपल्या कार्यकर्त्यांसमोर कोणी देशविरोधी घोषणा देत असेल तर पुर्ण ताकदीने त्याचं उत्तर देऊन आम्ही भाजपाचे आहोत सांगितलं पाहिजे. आपल्याच देशातील मोठ्या पक्षाचा नेता त्यांचं समर्थन करायला पोहोचते हे दुर्दैव असल्याचं सांगत ब्रीजमोहन अग्रवाल यांनी अप्रत्यक्षरित्या काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधीच्या जेएनयू भेटीवर टीका केली आहे.
'जो देशविरोधी घोषणा देईल त्याचं तोंड आपण फोडू शकतो हे त्यांना सांगण्याची गरज आहे. जर याच देशात तुम्ही जन्म घेतला आहे, याच देशातील अन्न खात आहात, पाणी पित आहात, मृत्यूनंतरही तुम्हाला जी जागा लागेल ती याच देशात मिळणार आहे, त्यामुळे भारत माता की जय बोलावंच लागेल. आपल्या मातृभुमीचा आदर करु नये असं कुराण, बायबल, रामायण किंवा गीता कोठेच लिहिलेलं नाही आहे', असं ब्रीजमोहन अग्रवाल यांनी म्हंटलं आहे. काँग्रेसने मात्र ब्रीजमोहन अग्रवाल यांच्या विधानावर आक्षेप घेत जोरदार टीका केली आहे.
Jab tak rashtra-drohiyon ke mann mein bhay paida nhi hoga ki unke khilaaf janata khadi ho jayegi, tab tak in par lagaam nhi lagegi-B Agrawal— ANI (@ANI_news) April 8, 2016
Agar Hindustan mein desh ke bantwaare ke naare lagaayenge to ye Rashtradroh hai- Chhattisgarh Min Brijmohan Agrawal pic.twitter.com/uJlVsBthle— ANI (@ANI_news) April 8, 2016