नवी दिल्ली - नागरिकत्व सुधारणा कायदा आणि एनआरसीविरोधात देशभरात ठिकठिकाणी विरोध प्रदर्शन होत असताना केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी केलेल्या वादग्रस्त विधानानंतर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली होती. मात्र कर्नाटकामधीलभाजपाचे मंत्री सीटी रवी यांनी अनुराग ठाकूर यांच्या वक्तव्याचं समर्थन केलं आहे.
Video: देश के गद्दारो को...गोली मारो ***; केंद्रीय मंत्र्यांच्या वादग्रस्त विधानावर विरोधक संतप्त
अनुराग ठाकूर यांनी भाषणातून देश के गद्दारो को अशी घोषणा देताना लोकांमधून गोली मारो **** को अशा प्रतिघोषणा देण्यात येत होत्या. अनुराग ठाकूर यांच्या विधानानंतर सोशल मीडियावर हॅशटॅग गद्दार असा ट्रेंड सुरु करण्यात आला होता. मात्र अनुराग ठाकूर यांच्या विधानाचं सीटी रवी यांनी समर्थन करत देशद्रोहींना बिर्याणी नाही, तर गोळ्या घातल्या पाहिजे असं वक्तव्य केले आहे.
सीटी रवी म्हणाले की, अनुराग ठाकूर यांनी देशद्रोहींविरोधात केलेल्या विधानावर जे लोकं टीका करत आहेत, ते दहशतवादी अजमल कसाब आणि याकूब मेमन यांच्या फाशीला देखील विरोध करत होते. सुधारित नागरिकत्व कायद्याबाबत चूकीची आणि खोटी माहिती पसरवण्यात येत असल्याचे सीटी रवी यांनी सांगितले.