पुरातन फोटो अन् परंपरा रथोत्सव: गादीपतींनी वाढविली शोभा, त्यातून उत्सव राहिला उभा
By admin | Published: November 15, 2015 9:12 PM
जळगाव : श्रीराम मंदिर संस्थान आणि रथोत्सवाला एक परंपरा आहे. शेकडो वर्षांपूर्वीची ही परंपरा केवळ संस्काराच्या शिदोरीवर आजही उभी आहे. तोच उत्साह अन् तेच एकीचे बळ या उत्सवात पहायला मिळते आणि लाखो बघणार्यांचे डोळे दिपून जातात.
जळगाव : श्रीराम मंदिर संस्थान आणि रथोत्सवाला एक परंपरा आहे. शेकडो वर्षांपूर्वीची ही परंपरा केवळ संस्काराच्या शिदोरीवर आजही उभी आहे. तोच उत्साह अन् तेच एकीचे बळ या उत्सवात पहायला मिळते आणि लाखो बघणार्यांचे डोळे दिपून जातात. अप्पा महाराजांनी सुरू केलेली परंपरा ही आजही त्याच उत्साहात सुरू आहे. अप्पा महाराजांनी समाधी घेतली १९१० मध्ये. त्यानंतरच्या काही कालावधीतील म्हणजे १९११ मधील त्यांचे कॅन्व्हॉसवरचे भव्य चित्र मंदिरात आजही दिसते. भक्त तेथे नतमस्तक होत असतात. नरसिंह सरस्वती स्वामीनरसिंह सरस्वती स्वामी महाराज हे अप्पा महाराजांचे गुरू. अप्पा महाराजांनी त्यांची सेवा केली. त्यांचे आशिर्वाद घेतले. स्वामी प्रवास करत तरसोदला आले होते. अप्पा महाराज हे शिवाजी उद्याननजीकच्या जागेत ध्यान धारणेसाठी जात असत. वैशाख शुद्ध दशमीला संत मुक्ताई पुण्यतिथी दिनी अप्पा महाराजांना दृष्टांत झाला. आळंदीला आषाढीला जा तेथे नरसिंह सरस्वतींकडून अनुग्रह घेण्याची आज्ञ्या अप्पा महाराजांना झाली होती. त्या दृष्टांतानुसार अप्पा महाराजांनी कृती केली. तेथील संस्थानला एक रथ त्या काळी भेट दिला गेला त्या रथाची परंपरा आजही तेथे सुरू आहे. रथ उभारणीतील कारागिर हे जळगावातील होते. पौष शुद्ध चतुदर्शिला रथ आळंदीला निघत असतो. स्वामी नरसिंह सरस्वती महाराज हे जळगावी येऊन गेल्यावर त्यांचेही एक भव्य चित्र रेखाटण्यात आले होते सन १९०० च्या अगोदरचे हे चित्र आजही श्रीराम मंदिरात आहे. बाबजी महाराजांची भेटबाबजी महाराज हे क्रांतीकारक. पंजाब प्रांतातून ते येथे आले होते. अप्पा महाराजांचे प्रवचन सुरू झाले की त्यांची धुनी सुरू होत असे. जळगावातील गोपाळपूरा भागात त्यांचे समाधी मंदिर आहे. अप्पा महाराजांचे ते ने स्नेही. त्यांचेही एक पुरातन चित्र मंदिरात आहे. यशवंतरावची महाराजयशवंतरावची महाराज यांचे जन्मगाव पंढरपूर तालुक्यातील भोसेगाव. संत मुक्ताईची पालखी अप्पा महाराज पंढरपूरला नेत असत. त्यावेळपासून यशवंतराव महाराजांचा अप्पा महाराजांशी स्नेह होता. त्यांचेही एक भव्य चित्र मंदिरात आहे. -------