ऑनलाइन लोकमतजम्मू-काश्मीर, दि. १०- भारताविरोधी दिलेल्या घोषणांमुळे चर्चेत आलेल्या श्रीनगरमधील एनआयटीला भेट देण्यासाठी गेलेल्या अनुपम खेर यांना विमानतळावरच रोखण्यात आलं आहे. एनआयटी कॅम्पसमध्ये जाण्यास त्यांना बंदी घालण्यात आली आहे. टी-20 वर्ल्डकपमध्ये वेस्ट इंडिजकडून भारताचा पराभव झाल्यानंतर एनआयटीतल्या काश्मिरी विद्यार्थ्यांनी फटाके फोडून जल्लोष केल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्याच्या प्रत्युत्तरादाखल बिगर काश्मिरी विद्यार्थ्यांनी एनआयटी संस्थेच्या कॅम्पसमध्ये तिरंगा फडकावला होता. या प्रकारानंतर एनआयटीत काश्मिरी आणि बिगर काश्मिरी विद्यार्थी असा वाद उफाळून आला होता. त्या पार्श्वभूमीवर अनुपम खेर एनआयटीमध्ये जाणार होते. मात्र त्यांना विमानतळावरच रोखण्यात आलं आहे. यावर एनआयटी भेट ही माझा वैयक्तिक भूमिका होती. भारतावर प्रेम करणा-या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याची गरज आहे, माझी भेट ही राजकीय हेतूनं प्रेरित नाही. जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्तींचीही भेट घेण्याचा विचार होता, मात्र त्यांनाही भेटू न दिल्याचं अनुपम खेर यांनी सांगितलं.
अनुपम खेर यांना एनआयटी श्रीनगरला जाण्यापासून रोखलं
By admin | Published: April 10, 2016 3:29 PM