Anupam Kher:अनुपम खेर हे केवळ उत्कृष्ट अभिनेतेच नाहीत तर ते अतिशय चांगले व्यक्ती देखील आहेत. अलीकडेच त्यांना कैलास गिरी ब्रह्मचारी यांचा एक फोटो दिसला, ज्यात ते आपल्या अंध आईला खांद्यावर घेऊन देशभर देवदर्शन घडवत आहेत. दरम्यान, अनुपम खेर यांनी सोमवारी त्यांचा फोटो ट्विट करत कैलास गिरी यांना भेटण्याची आणि मदत करण्याची इच्छा व्यक्त केली.
आईच्या इच्छेखातर देशभर प्रवासफोटोमध्ये कैलास गिरी त्यांच्या खांद्यावर बांबूच्या दोन टोपल्या बांधल्याचे दिसत आहेत. एका टोपलीत सामान ठेवले आहे, तर दुसऱ्या टोपलीत त्यांची बसलेली आहे. कैलास गिरी ब्रह्मचारी यांना या काळातील श्रवण कुमार म्हटले जाते. आईची इच्छा पूर्ण करण्यासाठी ते गेल्या 20 वर्षांपासून आपल्या 80 वर्षांच्या अंध आईला खांद्यावर घेऊन भारतातील विविध मंदिरांमध्ये जात आहेत.
ट्विट पहा-
अनुपम खेर म्हणाले...खेर यांनी फोटो ट्विट केला आणि लिहिले: 'फोटोत या व्यक्तीबद्दल खूप वर्णन केलेले आहे. प्रार्थना करा ते खरे आहे. या व्यक्तीचा ठावठिकाणा कोणाला आढळल्यास कृपया आम्हाला कळवा. यांना देशातील कोणत्याही तीर्थयात्रेसाठी आईसोबतचे जायचे असेल, तर अनुपम केअर्स त्यांना सर्वतोपरी मदत करेल.'