श्रीनगर : श्रीनगरच्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेमध्ये (एनआयटी) गेल्या दहा दिवसांच्या तणावानंतर रविवारी वातावरण सर्वसामान्य बनले आहे. विद्यार्थ्यांच्या हालचालींवर आणलेले निर्बंध शिथिल करण्यासह त्यांना आपापले उत्सव साजरे करण्याची मुभाही संस्थेच्या प्रशासनाने दिली आहे. ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांना रविवारी श्रीनगर एनआयटीला भेट देण्यास मज्जाव करण्यात आला. जम्मू-काश्मीर पोलिसांनी त्यांना विमानतळावरच रोखले.विद्यार्थ्यांच्या बहुतांश मागण्या मान्य झाल्या असल्या तरी एनआयटी काश्मीरबाहेर हलविण्याची मागणी मात्र फेटाळण्यात आली. विद्यार्थ्यांनी केलेल्या अनेक मागण्यांवर अंमलबजावणी करण्याबाबत आम्ही औपचारिक आदेश जारी केले आहेत, असे एनआयटी श्रीनगरचे निबंधक फयाज अहमद मीर यांनी सांगितले. अनुपम खेर एनआयटीला भेट देण्यासाठी श्रीनगरच्या विमानतळावर आले असता त्यांना परवानगी नाकारण्यात आल्याचे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची भीती लक्षात घेता त्यांना दिल्लीला परतण्यास सांगण्यात आले.
अनुपम खेर यांना विमानतळावर रोखले
By admin | Published: April 11, 2016 2:23 AM