अनुराग ठाकूर यांनी राहुल गांधींनाच चक्रव्यूहात अडकवले; काँग्रेसच्या चक्रव्यूहातले 7 पात्र सांगितले

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2024 06:59 PM2024-07-30T18:59:54+5:302024-07-30T19:01:38+5:30

Anurag Thakur Speech : भाजप नेते अनुराग ठाकुर यांनी लोकसभेत राहुल गांधींच्या भाषणावर जोरदार पलटवार केला.

Anurag Thakur Speech Congress, NG, IG, RG1, SG and RG2; Anurag Thakur said seven characters of Chakravyuh | अनुराग ठाकूर यांनी राहुल गांधींनाच चक्रव्यूहात अडकवले; काँग्रेसच्या चक्रव्यूहातले 7 पात्र सांगितले

अनुराग ठाकूर यांनी राहुल गांधींनाच चक्रव्यूहात अडकवले; काँग्रेसच्या चक्रव्यूहातले 7 पात्र सांगितले

Parliament Session : संसदेच्या पावसाळी अधिवेशनात विविध मुद्द्यांवरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी पाहाला मिळत आहे. आजही लोकसभेमध्ये विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि भाजप खासदार अनुराग ठाकूर (Anurag Thakur) यांच्यात जोरदार आरोप प्रत्यारोप झाले. ठाकूर यांनी अर्थसंकल्पावर आपली प्रतिक्रिया देताना राहुल गांधींच्या भाषणावरही हल्लाबोल केला. त्यांनी राहुल गांधींच्या 'महाभारत, अभिमन्यू आणि चक्रव्यूह' या मुद्द्याचा संदर्भ देत नवी पात्रांची ओळख करुन दिली. 

अनुराग ठाकूर यांनी मला शिविगाळ केली, राहुल गांधींचा गंभीर आरोप, लोकसभेत खडाजंगी  

अनुराग ठाकूर म्हणतात, 'अभिमन्यूची हत्या सहा नाही, तर सात महारथींनी केली होती. काही लोक अपघाती हिंदू आहेत आणि महाभारताचे त्यांचे ज्ञानही अपघाती आहे. अभिमन्यूला जयद्रथ, दुर्योधन, दुशासन, कर्ण, कप्रिचार्य, शकुनी आणि द्रोणाचार्य, या सात योद्ध्यांनी मारले होते. हे त्या नेत्याशिवाय इतर सर्वांना माहीत आहे. राहुल गांधींनी महाभारत वाचले किंवा पाहिले आहे की नाही, हे कुणालाही माहीत नाही.

चक्रव्यूहचे नवे NG, IG, RG1, SG आणि RG2...
यावेळी अनुराग ठाकूर यांनी अभिमन्यूची हत्या करणाऱ्या सात पात्रांचा संबंध काँग्रेस पक्षाच्या सात पात्रांशी जोडला आणि त्यांचे वर्णन सात चक्रव्यूह असे केले. ते म्हणाले की, 'चक्रव्यूहाचे पहिले पात्र काँग्रेस, दुसरे देशाचे पहिले पंतप्रधान - एनजी, तिसरे पात्र देशाच्या माजी पंतप्रधान आयजी, चौथे पात्र माजी पंतप्रधान आरजी 1, पाचवे पात्र एसजी, सहावे पात्र आरजी 2 आणि सातवे तुम्हा सर्वांना माहित आहे,' असे म्हणत ठाकूर यांचा निशाणा गांधी परिवारावर होता.

सहा लोकांनी चक्रव्यूह निर्माण केले अन् देशाला त्यात अभिमन्यूसारखे अडकवले: राहुल गांधी 

ते पुढे म्हणाले की, 'पहिल्या चक्रव्यूहमुळे देशाची फाळणी झाली. दुसऱ्या चक्रव्यूहामुळे काश्मीरची समस्या निर्माण झाली आणि चीनच्या ताब्यात भारताची जमीन गेली. तिसऱ्या चक्रव्यूहाने देशात आणीबाणी आणि पंजाबमध्ये अशांतता आणली. चौथ्या चक्रव्यूहाने बोफोर्स आणि शिखांची कत्तल केली. पाचव्या चक्रव्यूहाने सनातन धर्माविषयी द्वेष पसरवला, 12 लाख कोटी रुपयांच्या घोटाळ्यांना संरक्षण दिले आणि देशाच्या अर्थव्यवस्थेला भोवऱ्यात अडकवले. सहाव्या चक्रव्यूहांने देशाचे राजकारण, संसदीय परंपरा आणि संस्कृतीचे जास्त नुकसान झाले. सातव्या चक्रव्यूहाचे नाव मी घेणार नाही. या सात चक्रव्यूहांनी देशाला उपासमार, गरिबी, दहशतवाद, कट्टरता यांसारख्या अगणित दुष्टचक्रात अडकवले. या सर्व गोष्टींची पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात मुक्तता झाली, ' अशी घणाघाती टीका अनुराग ठाकूर यांनी यावेळी केली.

Web Title: Anurag Thakur Speech Congress, NG, IG, RG1, SG and RG2; Anurag Thakur said seven characters of Chakravyuh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.