देहरादून - बॉलिवूड स्टार अनुष्का शर्मा आणि भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली यांचा 11 डिसेंबर रोजी इटलीत विवाहसोहळा पार पडला. लग्नाची माहिती गुप्त ठेवण्यासाठी काही खास लोकांनाच लग्नाचं निमंत्रण देण्यात आलं होतं. मीडियालाही दोघांचं लग्न झाल्यानंतरच अधिकृत माहिती मिळाली. अनुष्का आणि विराच्या लग्नातील पाहुण्यांची यादी फारच छोटी होती. काही मोजक्या लोकांनाच लग्नासाठी निमंत्रित करण्यात आलं होतं. अनेकांची या लग्नाला उपस्थित राहण्याची होती, मात्र ते शक्य झालं नाही. यांच्यामधील एक व्यक्ती तर अनुष्का शर्माची आजी होती.
लग्नाच्या काही वेळआधीच अनुष्काच्या आजीला तिच्या लग्नाबद्दल कळलं होतं. त्यांचं आपल्या मुलासोबत जवळपास रोज बोलणं होत होतं, मात्र अनुष्काच्या लग्नाबद्दल त्यांना साधी कल्पनाही देण्यात आली नव्हती. आपल्या नातीच्या लग्नाला जाण्याची इच्छा असणा-या आजीला लग्नाचं साधं निमंत्रणही देण्यात आलं नाही.
देहरादूनमधील नेशविला रोडवर अनुष्का शर्माच्या पुर्वजांचं घर आहे. तिथे तिची आजी आणि काका-काकी राहतात. अनुष्काच्या आजीने सांगितल्यानुसार, त्यांना लग्न किंवा साखरपुड्याबद्दल काहीच माहिती नव्हतं. वृत्तपत्रांमध्ये वाचल्यानंतर आपल्याला हे कळलं. आपल्या नातीच्या लग्नाच्या आपल्याला बोलावलं नसल्याची खंत त्यांना नक्की आहे.
विराट कोहली आणि अनुष्का शर्मा 11 डिसेंबरला विवाहबंधनात अडकले. इटलीमधील टस्कनी इथल्या बोर्गो फिनोखिएतो या रिसॉर्टमध्ये विरुष्काचा विवाहसोहळा पार पडला. दिल्लीतील रिसेप्शन सोहळा पार पडल्यानंतर आता विराट आणि अनुष्काच्या विवाहानिमित्त दुसरा रिसेप्शन सोहळा 26 डिसेंबरला मुंबईत संपन्न होणार आहे. मुंबईत होणाऱ्या या रिसेप्शनला बॉलिवूड व क्रीडा विश्वातील अनेक दिग्गज हजर राहण्याची शक्यता आहे. हा सोहळा मुंबईतील अॅस्टर बॉलरुम, सेट रेगिस, लोअर परेल येथे ग्रॅण्ड रिसेप्शन होईल. या रिसेप्शनच्या निमंत्रण पत्रिका सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या रिसेप्शन सोहळ्याच्या निमंत्रण पत्रिकांची थीम पर्यावरणाशी निगडीत आहेत.