नवी दिल्ली: पंजाब नॅशनल बँकेला 11 हजार कोटींचा गंडा घालून फरार झालेल्या नीरव मोदी याच्याशी कोणताही सरकारी अधिकारी संपर्कात नसल्याचा ठाम विश्वास परराष्ट्र मंत्रालयाने व्यक्त केला. नवी दिल्लीत शुक्रवारी संध्याकाळी झालेल्या पत्रकार परिषदेत परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी ही माहिती दिली. नीरव मोदी याचा पासपोर्ट रद्द झाल्याने आता तो ज्या देशात आहे, तेथेच अडकून पडेल. मात्र, मी एक बाब अत्यंत विश्वासाने सांगू इच्छितो की, आमचा एकही अधिकारी या सद्गृहस्थाच्या (नीरव मोदी) संपर्कात नाही. तसेच सध्याच्या घडीला आम्हाला त्याचा नेमका ठावठिकाणाही माहिती नसल्याचे रवीश कुमार यांनी सांगितले. सूत्रांच्या माहितीनुसार, नीरव मोदी हा सध्या न्यूयॉर्कमधील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये वास्तव्याला आहे.