आज माणसापेक्षा पैशाला जास्त किंमत दिली जात आहे. हॉस्पिटलमध्ये गेला लाखावर रुपये डिपॉझिटसाठी भरावे लागतात. कपडालत्ता, मोबाईल, रिचार्ज, बँकांमध्ये मिनिमम बॅलन्स नसेल तर दंड, हॉटेलिंग आदी साऱ्याला पैशांत मोजले जाते. पैसा नसेल तर भविष्यातील जीवन जगणे मुश्किल बनले आहे. तुमच्याकडे गाडी कोणती? हातात मोबाईल कोणता? कपडे कोणत्या ब्रँडचे घातलेत? सारे काही पैशांत पाहिले जाते. यामुळे जो तो आज पैशांच्या मागे धावू लागला आहे. कोरोना काळाने तर आजच्या पिढीला पैशांचे महत्वच पटवून दिले आहे. यामुळे आपले भविष्य सुरक्षित करणे महत्वाचे बनले आहे. आम्ही आज छोट्या छोट्या बचतीतून कोटीभर रुपये कसे जमविता येतात ते सांगणार आहोत.
जर तुम्हाला कोणी सांगितले की, दररोज 30 रुपये बाजुला काढून ठेवले तर करोडपती बनता येते, आधी त्यावर विश्वास बसणार नाही. कारण एक कोटी काही थोडी थोडकी रक्कम नाहीय. पण हे देखील खरे आहे की दररोज 30 रुपये बचत केले आणि ते जर योग्य जागी मोठ्या कालावधीसाठी गुंतविले तर त्याचा 1 कोटी रुपयांचा फंड बनतो.
आजच्या जमान्यात म्युच्युअल फंडामध्ये (Mutual Fund Investment) गुंतवणूकदारांचा मोठा ओढा आहे. कारण सलग 20 वर्षे या फंडामध्ये गुंतविलेल्या पैशांतून मोठी रक्कम मिळत आहे. गेल्या दोन दशकांत म्युच्युअल फंडाने मोठा परतावा दिला आहे. काही लोकांनी आजपासून दोन दशके आधी या फंडामध्ये गुंतवणूक केली आहे. आता ते करोडपती बनले आहेत. जेवढ्या कमी वयात गुंतवणुकीला सुरुवात कराल तेवढा जास्त फायदा होणार आहे.
एखादा तरुण 20 व्या वर्षापासून म्युच्युअल फंडामध्ये दररोज 30 रुपये गुंतवत असेल तर त्याला चांगला फायदा मिळणार आहे. तो करोडपती बनू शकतो. यासाठी दर महिन्याला सिस्टेमॅटीक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (SIP) द्वारे गुंतवणूक करावी लागणार आहे. 20 वर्षांच्या तरुणाने दररोज 30 रुपये वाचविले तर त्याचे महिन्याला 900 रुपये होतात. आता ही रक्कम SIP द्वारे डायवर्सिफाइडम्युच्युअल फंडामध्ये गुंतविली जाऊ शकते. ही गुंतवणूक 40 वर्षे सुरु ठेवावी लागेल. असे केल्यास सरासरी 12.5 टक्के वार्षिक रिटर्नच्या हिशेबाने 40 वर्षांनंतर 1,01,55,160 रुपये मिळणार आहेत. काही म्युच्युअल फंडामध्ये 20 टक्के रिटर्नही मिळालेला आहे. वयानुसार SIP ची रक्कम बदलणार आहे.
अन्य महत्वाच्या बातम्या...
तुमचा पगार किती? 30,000; मोठी योजना घेऊन येतेय मोदी सरकार
CoronaVirus: कोरोना लस: भारत आज मोठे पाऊल टाकणार; पुण्यावरच सारी मदार
Unlock 4.0 : देशाला अनलॉक 4 चे वेध; मेट्रो, विमान, चित्रपटगृहे, शाळा सुरु होणार?
IPL2020 उसेन बोल्ट वाढदिवसाच्या पार्टीनंतर कोरोना पॉझिटिव्ह; ख्रिस गेलही अडचणीत