शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही मंगळावर जा, तेथे ना EC आहे ना EVM...!"; संबित पात्रा यांनी कुणाची खिल्ली उडवली?
2
"सच्चा शिवसैनिक..., आज मोठा गैरसमज त्यांनी दूर करून टाकला"; केसरकर यांच्याकडून CM शिंदेंचं मुक्त कंठानं कौतुक
3
एकनाथ शिंदेंची स्पष्ट भूमिका, भाजपाचा CM होण्याचा मार्ग मोकळा; फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
4
हिवाळी अधिवेशनात गदारोळ: अदानी समूहाच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी
5
ISRO ने हाती घेतली नवीन मोहिम; भारताचे यान थेट शुक्र ग्रहावर जाणार, सर्व गुपिते उघड होणार...
6
अजमेर दर्ग्यात शिव मंदिर? न्यायालयानं याचिका स्वीकारली, सर्व पक्षकारांना नोटीस पाठवली!
7
IND vs AUS : Rohit Sharma ला दुसऱ्या कसोटीत मोठी संधी, Virat Kohli शी साधणार बरोबरी? पाहा खास आकडेवारी
8
हिवाळी अधिवेशनात वक्फ दुरुस्ती विधेयक मांडले जाणार नाही; कारण काय? जाणून घ्या...
9
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
10
IPL मध्ये लागली ३० लाखांची बोली अन् पुढच्याच सामन्यात Arjun Tendulkar ने केली खराब कामगिरी, संघाच्याही पराभवाची हॅटट्रिक
11
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
12
काँग्रेसचे ठरले! ‘मतपत्रिकेवर निवडणुकी’साठी ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा
13
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
14
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
15
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
16
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
17
भरघोस पगार वाढ! IPL मध्ये या चौघांना मिळालं कोहलीपेक्षाही तगडं पॅकेज
18
शिंदेंनी बंडखोरी केली नसती तर भाजपा सत्तेत आली नसती; महायुतीच्या जुन्या सहकाऱ्याचे वक्तव्य
19
Eknath Shinde, Maharashtra CM Politics : “नापी है मुठ्ठी भर जमीन, अभी सारा आसमान बाकी है...”; एकनाथ शिंदेंनी शायरीतून सांगितला 'फ्युचर प्लॅन'
20
भयंकर! व्लॉगरची हत्या करून २ दिवस मृतदेहासोबत राहिला बॉयफ्रेंड; काय आहे हे संपूर्ण प्रकरण?

मोदींचा अपमान करणाऱ्याला जगातून गायब करू: भाजप खासदार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2018 2:29 PM

वादग्रस्त विधानावर विरोधकांची टीका

मध्य प्रदेशमध्ये यंदाच्या वर्षाच्या अखेरीस विधानसभा निवडणूक होणार आहे. मात्र त्याआधीच नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे. भाजपचे मध्य प्रदेशामधील खासदार मनोहर ऊंटवाल यांनी विरोधकांवर टीका करताना वादग्रस्त विधान केलं आहे. 'आमच्या पंतप्रधानांचा आणि मुख्यमंत्र्यांचा अपमान करणाऱ्याला आम्ही या जगातून गायब करु,' असं ऊंटवाल यांनी म्हटलं. किसान सन्मान यात्रेदरम्यान बोलताना त्यांनी हे विधान केलं. याआधीही ऊंटवाल यांनी अनेकदा वादग्रस्त विधानं केली आहेत. गेल्याच आठवड्यात खासदार ऊंटवाल यांनी मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांच्यावर टीका केली होती. दिग्विजय सिंह दिल्लीवरुन आयटम घेऊन आले आहेत, असं वादग्रस्त वक्तव्य ऊंटवाल यांनी केलं होतं. दिग्विजय सिंह यांची पत्नी अमृता सिंह यांच्याबद्दल बोलताना त्यांची जीभ घसरली होती. मात्र त्यांनी अमृता सिंह यांच्या नावाचा उल्लेख केला नव्हता. या विधानावरुन ऊंटवाल यांच्यावर सर्व स्तरातून टीका झाली होती. यानंतर ऊंटवाल यांनी याबद्दल सारवासारव केली. 'मी दिग्विजय सिंह यांचा खूप आदर करतो आणि महिलांचाही सन्मान करतो,' असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं होतं. माझ्या विधानाची मोडतोड करुन ते दाखवण्यात आलं, असाही दावा त्यांनी केला.  

टॅग्स :BJPभाजपा