शहरं
Join us  
Trending Stories
1
घासून येणार की ठासून? धाकधूक अन् टेन्शन!; ‘काहीही होऊ शकते’ असे किमान १०० मतदारसंघ
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
3
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
4
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
5
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढली! थोड्याच वेळात मतमोजणीला सुरुवात; प्रशासन 'ॲक्शन मोड'वर
6
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
7
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
8
"शेवटचे मत मोजेपर्यंत मोजणी केंद्र सोडू नका, निवडून आल्यावर थेट मुंबईला या"
9
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
10
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
11
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
12
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
13
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
14
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
15
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
16
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
17
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
18
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
19
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
20
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा

मुलायम सिंह यादव यांच्या सुनेने दिले राम मंदिरासाठी ११ लाख; कारसेवकांबद्दल मोठे वक्तव्य

By देवेश फडके | Published: February 20, 2021 2:15 PM

राम मंदिरासाठी संपूर्ण देशभरात देणगी गोळा करण्याच्या मोहिमेने अधिक व्यापक स्वरुप घेतले आहे. मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते देशभर फिरून राम मंदिरासाठी देणगी गोळा करण्याचे काम करत आहेत. यातच समाजवादी पक्षाचे संस्थापक आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायम सिंह यादव यांच्या धाकट्या सुनेने (Aparna Yadav) राम मंदिरासाठी ११ लाख रुपयांची देणगी दिल्याची माहिती मिळाली आहे.

ठळक मुद्देराम मंदिरासाठी अपर्णा यादव यांच्याकडून ११ लाखांची देणगीकारसेवकांवरील गोळीबार दुःखद - अपर्णा यादवजे घडून गेले, ते बदलू शकत नाही - अपर्णा यादव

लखनऊ :राम मंदिरासाठी संपूर्ण देशभरात देणगी गोळा करण्याच्या मोहिमेने अधिक व्यापक स्वरुप घेतले आहे. मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते देशभर फिरून राम मंदिरासाठी देणगी गोळा करण्याचे काम करत आहेत. यातच समाजवादी पक्षाचे संस्थापक आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायम सिंह यादव यांच्या धाकट्या सुनेने राम मंदिरासाठी ११ लाख रुपयांची देणगी दिल्याची माहिती मिळाली आहे. (aparna Yadav donates 11 lakhs for the construction of Ram Mandir in Ayodhya)

मुलायम सिंह यादव यांच्या धाकट्या सुनेचे नाव अपर्णा यादव (Aparna Yadav) असून, त्यांनी राम मंदिरासाठी ११ लाख रुपयांची देणगी दिली आहे. ''राम मंदिरासाठी स्वेच्छेने देणगी दिली आहे. माझ्या कुटुंबाने काय केले, याची जबाबदारी घेऊ शकत नाही. भूतकाळ कधीच भविष्यासमान नसतो, अशी प्रतिक्रिया अपर्णा यादव यांनी यावेळी दिली. 

अवध प्रांताचे प्रचारक कौशल आणि कार्यवाह प्रशांत भाटिया माजी मुख्यमंत्री मुलायम सिंह यादव यांची सून अपर्णा यादव यांच्या निवासस्थानी राम मंदिरासाठी देणगी गोळा करण्यासाठी गेले होते. यावेळी अपर्णा यादव यांनी राम मंदिर उभारणीसाठी ११ लाख रुपयांची देणगी दिली. 

इंधनदरवाढ होणार नाही, तो दिवस 'शुभ दिन' म्हणून घोषित करावा: प्रियंका गांधी

कारसेवकांवरील गोळीबार दुःखद

मुलायम सिंह यादव मुख्यमंत्री असताना अयोध्येत कारसेवकांवर झालेला गोळीबार दुःखद असल्याचे महत्त्वाचे वक्तव्य अपर्णा यादव यांनी यावेळी केले. ''त्यांनी आधी जे केले आणि ज्या परिस्थितीत हे सर्व घडले, ते दुःखद होते. यावर अधिक भाष्य करू इच्छित नाही. जे घडले, ते आज बदलले जाऊ शकत नाही'', असे अपर्णा यादव यांनी सांगितले. 

राम मंदिर उभारण्यावर भर

श्रीराम जन्मभूमि तीर्थक्षेत्र ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांनी सांगितले की, राम मंदिर उभारण्यासाठी आतापर्यंत किती निधी जमा झाला, याचा अंदाज बांधणे कठीण आहे. मात्र, एक हजार कोटी रुपये बँक खात्यात जमा झाले आहेत. अयोध्येत भव्य राम मंदिर बांधण्यावर आमचा अधिकाधिक भर आहे, असे चंपत राय यांनी नमूद केले आहे. 

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्याMulayam Singh Yadavमुलायम सिंह यादवUttar Pradeshउत्तर प्रदेश