एपीजे अब्दुल कलाम- निधन प्रतिक्रिया-१
By admin | Published: July 29, 2015 12:42 AM
एपीजे अब्दुल कलाम निधन
एपीजे अब्दुल कलाम निधन प्रतिक्रिया देशाची मोठी हानी अब्दुल कलाम यांच्या अकस्मात निधनाने देशाची फार मोठी हानी झाली आहे. कलाम साहेब हे जागतिक कीर्तीचे शास्त्रज्ञ होतेच, परंतु त्यापेक्षा अधिक ते एक चांगले व्यक्ती आणि शिक्षक होते. शेवटपर्यंत त्यांनी नवीन पिढी घडविण्याचे कार्य केले.- सुलेखा कुंभारे, संयोजिका, बहुजन रिपब्लिकन एकता मंचशेवटच्या श्वासापर्यंत देशसेवा भारताच्या इतिहासासाठी हा दु:खाचा दिवस आहे. देशाने आपला एक महान हिरा गमावला आहे. त्यांनी आपले ज्ञान आणि बुद्धीने यश मिळविले होते. माझ्या संस्थेत ते आले होते, परंतु मी त्यांना भेटू शकलो नाही, याची आजही खंत आहे. त्यांनी भारताला नवीन दिशा दाखविण्याचे कार्य केले. - समीर मेघे, आमदार देशाने मार्गदर्शक गमावला कलाम साहेब देशाचे मार्गदर्शक होते. मिसाईल मॅन म्हणून ते प्रसिद्ध होते. त्यांचे कार्य व योगदान देश कधीच विसरणार नाही. त्यांची जागा कधीच कुणी घेऊ शकणार नाही. राष्ट्रउभारणीत त्यांची मोठी भूमिका होती. त्यांना माझी विनम्र श्रद्धांजली. -कृष्णा खोपडे, आमदार