नवी दिल्ली - टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्ण पदकाची अपेक्षा असलेल्या दोन्ही खेळाडूंकडून भारतीयांची निराशा झाली आहे. बॉक्सर मेरी कॉमसोबत झालेल्या दगाफटक्यामुळे तिला स्पर्धेतून बाहेर पडावे लागले. तर, रौप्यपदक विजेता पी.व्ही सिंधूही उपांत्य सामन्यात पराभूत झाल्याने या दोन्ही खेळांडूकडून काही प्रमाणात निराशा झाली आहे. मेरी कोमच्या सामन्याबद्दल जागतिक पातळीवर शंका उपस्थित होत आहे. मात्र, ऑलिंपिंक स्पर्धेत अपील नसल्याने तोच निर्णय अंतिम असतो. तरीही, मेरी कोमने मायदेशी परताच मी देशाची माफी मागते, असे भावनिक उद्गार काढले आहेत.
मेरी कोमने विजय झाल्याचे मानत हात वर केला होता, पण अंपायरांच्या निर्णयामुळे तिला धक्का बसला. मॅचनंतर मेरी कोमने अंपायरांचा निर्णय दुर्दैवी असल्याचे म्हटले होते. त्यानंतर, आज दिल्ली विमानतळावर आगमन झाल्यानंतर पत्रकारांनी तिला घेरले. त्यावेळी, मेरी कोमने विनम्रपणे देशाची माफी मागत असल्याचं म्हटलं. विना मेडल जिंकता परत येणं मला अतिशय वाईट वाटतंय. दोन राऊंड सहजपणे जिंकल्यानंतर पराभूतच कशी होऊ शकते, रिकाम्या हातीने आल्याबद्दल मी देशावासीयांची माफी मागते, मेरीने म्हटले आहे. दरम्यान, मेरीने माफी मागिल्यानंतर ट्विटरवर मेरी कोम ट्रेंड करत असून नेटीझन्स तिच्या समर्थनार्थ, देश तुझ्या समर्थनार्थ असल्याचं म्हणत आहेत.
यापूर्वीही व्यक्त केली होती नाराजी
पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत मेरी कोमने नाराजी व्यक्त केली आहे. तसेच आंतरराष्ट्रीय बॉक्सर संघटनेवर देखील गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. माहित नाही काय गडबड आहे, आयओसीसोबत काय समस्या आहे. मी हा निर्णय अजिबात समजू शकलेले नाहीय. मी स्वत: त्यांची एक सदस्य राहिलेली आहे. त्यांनी नेहमी एकाच बाजुचा विचार केला आहे. माझ्याकडून यावर सल्लेदेखील देण्यात आले होते. मात्र, माझ्यासोबत न्याय करत आला नाही, असे मेरी कोम म्हणाली होती.
मी हरल्यावर मला खूप वेळ विश्वासच बसला नाही. मीच जिंकलेय असे वाटत होते. रिंगमध्ये मी आनंदी होते. मॅच संपल्यानंतरही वाईट वाटले नव्हते. माझ्या मनाला माहिती होते मी मॅच जिंकलेय, पण जेव्हा सोशल मीडिया आणि कोचला पाहिले तेव्हा मला मी मॅच हरल्याचे जाणवले. मी या निर्णयाला आव्हान देऊ शकत नाही, परंतू मला विश्वास आहे जगाने सत्य पाहिले असेल, अशा शब्दांत मेरीने नाराजी व्यक्त केली होती