शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Assembly Elections : हरियाणा-काश्मीरनंतर आता महाराष्ट्र विधानसभेचे बिगुल वाजणार! निवडणूक आयोगाने तयारी केली सुरू
2
तिरुपती लाडू प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी; मुख्यमंत्री खोटारडे, त्यांना समज द्या : जगनमोहन रेड्डी
3
रश्मी ठाकरे पुढच्या मुख्यमंत्री...! कलानगरात झळकले बॅनर्स, राजकीय वर्तुळात चर्चा
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरी व व्यापारात लाभ होतील; अचानक धन प्राप्ती होईल
5
चार हजार वर्षांपूर्वीच्या प्राचीन वस्तू अमेरिका भारताला देणार; पंतप्रधानांनी मानले आभार
6
अग्रलेख : पंतप्रधान पुन्हा आक्रमक; महायुतीची सत्ता टिकविण्यासाठी भाजप पुन्हा सरसावला
7
मराठा, ओबीसी आरक्षणावरून तणाव कायम; वडीगोद्रीत दोन्ही समाजांचे आंदोलक रस्त्यावर
8
पोलिस करतात विनातिकीट प्रवास, धमक्या देतात; रेल्वे टीसींची नाराजी
9
देवाच्या प्रसादात राजकारण कशाला कालवता?
10
सर्व्हे सांगतात, मविआला मुंबईत २२ जागा मिळणार
11
बापरे बाप, धावत्या रेल्वेत निघाला भलामोठा साप; प्रवाशांची धावपळ उडाली, पहा Video...
12
नाना पटोलेच होतील पुढील मुख्यमंत्री; काँग्रेस नेत्याचा दावा, नागपुरातील सहाही जागांवर लढणार
13
PM Modi US Visit Live: ...पण नियतीने मला राजकारणात आणले; मोदींनी अमेरिकेत भारतीयांसमोर मन मोकळे केले
14
Pune Rain Update: तीन दिवस उकाडा, पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; अवघ्या 5 मिनिटात रस्त्याला नदीचे स्वरूप
15
मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती
16
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
17
धक्कादायक! अरबाज पटेल घराबाहेर, आठ आठवड्यांचा प्रवास संपला; निक्कीला अश्रू अनावर
18
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
19
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला

Parliament Session: संसदेत भज्जीचे जबरदस्त डेब्यू, पहिल्याच भाषणात सर्वांची मनं जिंकली; सभापतींनी केलं कोतुक, पाहा VIDEO

By ऑनलाइन लोकमत | Published: August 03, 2022 6:30 PM

Harbhajan Singh in Rajyasabha: गुरुद्वारांवरील हल्ल्यांमुळे जगातील प्रत्येक शीख व्यक्तीची भावना दुखावली गेली. आम्हालाच का टार्गेट केले जात आहे? अशा प्रकारचे हल्ले आम्हाला अनेक प्रश्न उपस्थित करायला भाग पाडतात. हे हल्ले आमच्यावरच का? आम्हालाच का लक्ष्य केले जात आहे?

आम आदमी पक्षाचे खासदार हरभजन सिंग यांनी आज राज्यसभेत शून्य प्रहरात अफगाणिस्तानचा मुद्दा उपस्थित केला. यावेळी त्यांनी अफगाणिस्तानात शीख आणि गुरुद्वारांवर झालेल्या हल्ल्यांसंदर्भात भाष्य केले. एवढेच नाही, तर सरकारने याकडे लक्ष द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी संसदेत बोलताना हरभजन सिंग हात जोडतानाही दिसून आले.

'शीखांच्या भावना दुखावल्या गेल्या' -हरभजन सिंग म्हणाले, गुरुद्वारांवरील हल्ल्यांमुळे जगातील प्रत्येक शीख व्यक्तीची भावना दुखावली गेली. आम्हालाच का टार्गेट केले जात आहे? अशा प्रकारचे हल्ले आम्हाला अनेक प्रश्न उपस्थित करायला भाग पाडतात. हे हल्ले आमच्यावरच का? आम्हालाच का लक्ष्य केले जात आहे? हरभजन यांचे प्रश्न संपल्यानंतर सभापती व्यंकय्या नायडू यांनी त्याचे कौतुक केले. यावर खासदारांनीही टाळ्यां वाजवून त्यांना दाद दिली.

कोरोना काळाची करून दिली आठवण -हरभजन म्हणाले, कोरोना काळात गुरुद्वारांनी जगभरात ऑक्सिजनपासून ते औषधे आणि अन्नापर्यंत सर्व प्रकारच्या गरजा पुरवल्या. एवढेच नाही, तर देशाच्या स्वातंत्र्यापासून ते स्वातंत्र्यानंतरही शीख प्रत्येक क्षेत्रात आपले शौर्य, मेहनत आणि धैर्यासाठी ओळखले जातात. यामुळे आमच्या गुरुद्वारांवर होणारे हल्ले आम्हाला व्यथित करतात, असेही हरभजन म्हणाले.

काबूल येथील गुरुद्वाऱ्यात हल्ला -हरभजन म्हणाले, 18 जूनला काबूलमध्ये गुरुद्वारा कार्ते परवनमध्ये हल्ला झाला. यात दोन जणांचा मृत्यू झाला आणि अनेक जण जखमी झाले. यापूर्वी 25 मार्चला रायसाहब गुरुद्वाऱ्यावर हल्ला झाला. दोन दिवसांनंतर याच गुरुद्वाऱ्यावर पुन्हा हल्ला झाला. या हल्ल्यांतही लोकांचा मृत्यू झाला. एवढेच नाही,  तर 1980 च्या दशकात दोन लाखहून अधिक हिंदू आणि शीख अफगाणिस्तानात हारत होते. मात्र, आता ही संख्या अत्यंत कमी झाली आहे.

हजारों शीखांचा गड होता... आता मूठभर राहिले आहेत... -हरभजन सिंग संसदेत म्हणाले, अफगाणिस्तान कधीकाळी हजारो शीखांचा गड होता. अनेक दशकांच्या संघर्षामुळे ही संख्या कमी होऊन मूठभर उरली आहे. 1980 च्या दशकात अफगाणिस्तानात 2.20 लाख शीख आणि हिंदू राहत होते. 1990 च्या दशकाच्या सुरुवातीस हा आकडा 15 हजारवर आला. 2016 मध्ये 1350 वर आला आणि आता तेथे केवळ 150 शीखच उरले आहेत.

सभापतींनी केलं कौतुक -हरभजन यांचे बोलणे संपल्यानंतर, सभापती व्यंकय्या नायडू म्हणाले, हरभजन सिंग आपण एक चांगला मुद्दा उपस्थित केला आहे. नायडू म्हणाले, हरभजन सिंग प्रसिद्ध क्रिकेटर आहेत. त्यांनी जो विषय उपस्थित केला तो अत्यंत महत्वाचा आहे. मला वाटते, की परराष्ट्रमंत्री याकडे नक्कीच लक्ष देतील.

टॅग्स :Harbhajan Singhहरभजन सिंगParliamentसंसदRajya Sabhaराज्यसभाAAPआपAam Admi partyआम आदमी पार्टी