नवी दिल्ली : भारत चीन वाद हिंसक होताच भारतात मेड ईन चायनाविरोधात लाट आली आहे. यामुळे भारतीयांनी चीनच्या उत्पादनांवर बहिष्कार टाकण्यास सुरुवात केली असून केंद्र सरकारनेही 69 चिनी अॅपवर बंदी आणली आहे. याचा फायदा आता अमेरिकी कंपन्यांनी उठविण्यास सुरुवात केली आहे. अमेरिकेची प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माती कंपनी अॅपलने पॉप्युलर फोन Apple iPhone XS Max वर मोठा डिस्काऊंट देऊ केला आहे. अॅमेझॉनवर हा फोन एमआरपीपेक्षा 40000 रुपयांनी कमी किंमतीत मिळत आहे.
अॅपलने मूळ किंमतीमध्ये 36 टक्क्यांची कपात केली आहे. यामुळे या आयफोन एक्सएस मॅक्सची किंमत घटून 69900 रुपये झाली आहे. हा फोन तीन रंगामध्ये उपलब्ध आहे. मात्र, कमी झालेली किंमत ही केवळ गोल्ड व्हेरिअंटसाठी करण्यात आली आहे. सिल्व्हर व्हेरिअंट (64जीबी) सध्या वेबसाईटवर ऑऊट ऑफ स्टॉक दिसत आहे. तर स्पेस ग्रे कलर सध्या 68900 रुपयांना दिसत आहे.
या फोनमध्ये 6.5 इंचाचा सुपर रेटिना OLED डिस्प्ले देण्यात आला आहे. फोटोग्राफीसाठी फोनमध्ये 12 मेगापिक्सलचा ड्युअल कॅमेरा देण्यात आला आहे. तर सेल्फीसाठी यामध्ये 7 मेगापिक्सलचा ट्रूडेप्थ कॅमेरा आहे. फोन IP68 रेटिंगचा असून 2 मीटर पाण्यामध्ये तो 30 मिनिटांपर्यंत राहू शकतो.
स्वस्त फोन लाँच करण्याची शक्यताअॅपल लवकरच iPhone 12 चे काही मॉडेल लाँच करण्याची शक्यता आहे. यामध्ये आयफोन 12 चे दोन फोर जी मॉडेल असतील. या सोबतच कंपनी ५जी असलेले फोन लाँच करणार आहे. मात्र, ४जीचे फोन भारतासारख्या ४जी सेवा असलेल्या देशांमध्ये लाँच केले जाणार आहेत. या बाजारांमध्ये आयफोनच्या किंमतीही कमी केल्या जाणार आहेत. यामुळे महागडे आयफोन घेऊ न शकणारे लोकही याकडे वळतील अशी अपेक्षा कंपनीला आहे.
वनप्लसही आणणार स्वस्त फोनवनप्लस या चीनच्या प्रिमिअम स्मार्टफोन कंपनीने यंदाचे फ्लॅगशिप हँडसेट OnePlus 8 आणि OnePlus 8 Pro लाँच केले आहेत. काही दिवसांपूर्वीच 25000 च्या आतील फोन बाजारात येणार असल्याचे संकेत दिलेले असताना पुन्हा काहीतरी नवीन येत असल्याची घोषणा करण्यात आली आहे. कंपनीने वनप्लस Z/OnePlus Nord ची घोषणा केली आहे. या फोनचे लाँचिंगही लवकरच करण्यात येणार आहे.