शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
4
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
5
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
6
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
7
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
8
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
9
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
10
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
11
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
12
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
13
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
14
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
15
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
16
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
17
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
18
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

मान गए Apple! तैवानच्या खांद्यावर बंदूक ठेवून चीनवर जबरी वार; प्रकल्पच भारतात हलवणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2020 14:03 IST

कोरोना व्हायरसमुळे आधीच बिजिंग आणि वॉशिंग्टनमध्ये मोठे ट्रेड वॉर सुरु आहे. गेल्या दोन वर्षांपासून सुरु असलेल्या या युद्धाला आता आणखी वेग आला आहे. अ‍ॅपलने त्याच्या पुरवठादार कंपन्यांना चीनच्या बाहेर उत्पादन प्रकल्प हलविण्यास सांगितले आहे.

ठळक मुद्देफॉक्सकॉनचा हा निर्णय म्हणजे अ‍ॅपलचाच असण्याची शक्यता आहे.फॉक्सकॉनने श्रीपेरुंबदूर प्रकल्पामध्ये मोठी गुंतवणूक करण्याची योजना बनविली आहे. सध्या इथे आयफोनचे एक्सआर मॉडेल बनविले जाते. ही गुंतवणूक पुढील तीन वर्षांमध्ये केली जाणार आहे.

नवी दिल्ली : भारत-चीन-अमेरिका तणावाच्या पार्श्वभूमीवर एक मोठी बातमी येत आहे. ही बातमी तैवानची कंपनी फॉक्सकॉन (Foxconn) शी संबंधित आहे. ही कंपनी भारतातील प्रकल्प आणखी मोठा करण्याच्या तयारीला लागली आहे. हा प्रकल्प चेन्नईच्या पेरुबुदूरमध्ये आहे. यासाठी कंपनी एक अब्ज डॉलर म्हणजेच 7500 कोटी रुपये गुंतविणार आहे. महत्वाचे म्हणजे ही कंपनी अ‍ॅपलचे मोबाईल असेंबल करते.  (Apple shifting its production out from china) 

फॉक्सकॉनचा हा निर्णय म्हणजे अ‍ॅपलचाच असण्याची शक्यता आहे. कारण अ‍ॅपल चीनमधील उत्पादन दुसऱ्या देशात हलविण्याच्या तयारीला लागल्याचे सांगितले जात आहे. कोरोना व्हायरसमुळे आधीच बिजिंग आणि वॉशिंग्टनमध्ये मोठे ट्रेड वॉर सुरु आहे. गेल्या दोन वर्षांपासून सुरु असलेल्या या युद्धाला आता आणखी वेग आला आहे. अ‍ॅपलने त्याच्या पुरवठादार कंपन्यांना चीनच्या बाहेर उत्पादन प्रकल्प हलविण्यास सांगितले आहे. याचा परिणामही दिसू लागला असल्याचे एका सूत्राने रॉयटर्सला सांगितले आहे. 

फॉक्सकॉनने श्रीपेरुंबदूर प्रकल्पामध्ये मोठी गुंतवणूक करण्याची योजना बनविली आहे. सध्या इथे आयफोनचे एक्सआर मॉडेल बनविले जाते. ही गुंतवणूक पुढील तीन वर्षांमध्ये केली जाणार आहे. फॉक्सकॉनद्वारा अ‍ॅपलचे जे अन्य मॉडेल चीनमध्ये बनविले जातात  ते आता भारतातच बनणार आहेत. तैवानच्या तैपेईमध्ये फॉक्सकॉनचे मुख्यालय आहे. फॉक्सकॉनच्या या पावलामुळे भारतात जवळपास 7000 नोकऱ्या उपलब्ध होणार आहेत. कंपनीच्या आंध्रप्रदेशमध्येही प्रकल्प आहे. ज्यामध्ये कंपनी शाओमीसाठी स्मार्टफोन बनविते. 

गेल्या महिन्यातच संकेत दिलेले...फॉक्सकॉनचे अध्यक्ष लिऊ योंग वे यांनी गेल्या महिन्यातच भारतात गुंतवणूक वाढविणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र, अधिक माहिती दिली नव्हती. भारतात स्मार्टफोनच्या एकूण विक्रीचा 1 टक्के हिस्सा अ‍ॅपलकडे आहे. अ‍ॅपल ही जगातील दुसरी सर्वात मोठी स्मार्टफोन बनविणारी कंपनी आहे. अ‍ॅपल काही मॉडेल बंगळुरूमध्ये तैवानची आणखी एक कंपनी विस्ट्रॉन कॉर्पमधूनही असेम्बल करते. ही कंपनी आणखी एक प्रकल्प उभारणार असून आणखी अ‍ॅपलचे फोन यामध्ये बनविले जाणार आहे. 

अन्य महत्वाच्या बातम्या...

हद्द झाली! अनुकंपाखाली नोकरी दिली नाही; लॉकडाऊनमध्ये तरुणाने SBI ची हुबेहूब शाखाच उघडली

मोठा दिलासा! पुन्हा पुन्हा वापरता येणार N95 मास्क; केवळ 90 मिनिटांत 'चक्र डिकोव्ह' करणार निर्जंतुक

अमेरिका की आशिया, 'विश्वयुद्ध 2020' भडकल्यास कोण भिडतील? तज्ज्ञांनी लावले अंदाज

Ganeshotsav 2020 : यंदा सार्वजनिक गणेशोत्सव कसा साजरा करणार? सरकारच्या मार्गदर्शक सूचना जारी

चीननेच कोरोनाची माहिती लपविली, WHO ही साथीला! आरोप करणाऱ्या महिला सायंटिस्टचे पलायन

परीक्षा नाही, केवळ एक मुलाखत अन् सरकारी नोकरी; 43000 रुपये पगार

टॅग्स :Apple IncअॅपलApple iPhone Xअ‍ॅपल आयफोन XChennaiचेन्नईAndhra Pradeshआंध्र प्रदेशchinaचीन