शहरं
Join us  
Trending Stories
1
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
2
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
3
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
4
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
5
Animal चा समाजावर वाईट परिणाम; रणबीर कपूर म्हणाला, "मलाही तुमचं मान्य आहे..."
6
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
7
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."
8
"बिहार खड्ड्यात गेलाय’’, पोटनिवडणुकीतील पराभवानंतर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया 
9
IND vs AUS :आम्ही दबावात होतो; पण... बुमराहनं शेअर कमबॅक मागची स्टोरी
10
विदर्भातील 'या' १२ आमदारांना मतदारांनी नाकारले; महायुतीच्या आमदारांनाही दिला झटका 
11
पेन्शनधारकांनो, नो टेन्शन; हयातीचा दाखला मिळणार घरपोच!
12
IPL Auction 2025: "थोडे जास्तच पैसे गेले, आम्ही रिषभ पंतसाठी..."; LSGच्या मालकांनी सांगितला 'फसलेला' प्लॅन
13
Gold Silver Price Today : सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; पटापट चेक करा दिल्ली ते कोलकात्यापर्यंतचे दर
14
"कुटुंबात 4 जण, मतं मिळाली फक्त 2", 'तो' व्हिडीओ शेअर करत अभिनेत्यानं EVM वर घेतला संशय
15
लाडक्या बहिणींना पहिला हप्ता कधी येणार? १५०० की २१०० रुपये...; दिवाळी बोनस मिळणार की नाही...
16
मला फक्त विधानपरिषद नको, गृह किंवा अर्थखातं हवं; लक्ष्मण हाकेंची महायुतीकडे मागणी
17
Video: उच्चशिक्षित इंजिनीअर, प्रेयसीच्या विरहात बनला भिकारी; अवस्था पाहून लोकंही हळहळले
18
Maharashtra Vidhan Sabha Elecation 2024: नाना पटोलेंवर प्रफुल्ल पटेल वरचढ!
19
Arvind Kejriwal : अरविंद केजरीवालांची खेळी, वृद्धांसाठी मोठी घोषणा, दरमहा मिळणार 'इतकी' पेन्शन!
20
उर्वशी रौतेलाने सांगितलं अद्याप अविवाहित असल्याचं कारण; म्हणाली, "माझ्या जन्म पत्रिकेत..."

पासपोर्टसाठी अर्ज करा आता हिंदी भाषेतून !

By admin | Published: April 23, 2017 6:57 PM

नुकत्याच जारी केलेल्या एका तरतुदीनुसार पासपोर्टसाठी आता हिंदी भाषेतूनही अर्ज करता येणार आहे

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 23 - देशाबाहेर प्रवासादरम्यान आवश्यक पुराव्यांपैकी महत्त्वाचा पुरावा हा पासपोर्ट आहे. पासपोर्ट असल्यावरच तुम्हाला देशाबाहेर प्रवास करणं शक्य होणार आहे. विशेष म्हणजे पासपोर्टसाठी (पारपत्र) आता ऑनलाइन पद्धतीनंही अर्ज करता येतो. त्यामुळे अवघ्या 10 दिवसांत अर्जदाराला त्याचा पासपोर्ट मिळवता येणार आहे. डॉक्युमेंट्ससाठी तुम्हाला धावपळही करावी लागणार नाही. पासपोर्टसाठी अर्ज करणा-या अर्जदाराला स्वतःचे डॉक्युमेंट्स ऑनलाइन पद्धतीनं देता येणार आहेत. तसेच ओळखपत्र आणि रहिवास दाखल्याच्या जागेवर फक्त एका आधार कार्डवर तुम्हाला पासपोर्ट मिळवता येणार आहे. त्याप्रमाणेच इंग्रजी भाषेचं ज्ञान नसलेल्या लोकांसाठी एक पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. परराष्ट्र मंत्रालयाने नुकत्याच जारी केलेल्या एका तरतुदीनुसार पासपोर्टसाठी आता हिंदी भाषेतूनही अर्ज करता येणार आहे. संसदीय समितीच्या नवव्या अहवालातील अधिकृत भाषे संबंधातील शिफारशी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी स्वीकारल्यानंतर परराष्ट्र मंत्रालयाने हा निर्णय जाहीर केला आहे. या समितीने 2011 साली हा अहवाल सरकारला दिला होता. पासपोर्ट कार्यालयात हिंदी आणि इंग्रजी या दोन्हीही भाषांमध्ये अर्ज उपलब्ध असावा, अशी शिफारस समितीकडून करण्यात आली होती. संसदीय समितीनं हिंदीत भरलेले अर्ज स्वीकारले जाऊन पासपोर्टवरील सर्व नोंदी हिंदीत असण्याची अट घातली होती, त्याप्रमाणेच पासपोर्ट आणि व्हिसासंबंधित माहितीही परराष्ट्र मंत्रालयाच्या वेबसाईटवर हिंदीत टाकण्यात यावी, असंही समितीनं सूचवलं होतं. तसेच पासपोर्ट कार्यालयात हिंदीतून काम करण्याची परवानगी देण्यासोबतच पासपोर्ट कार्यालय आणि दूतावासात हिंदी अधिकाऱ्यांची नेमणूक करण्याची समितीची अट होती. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी संसदीय समितीच्या या सर्व शिफारशींना मंजुरी दिली असून, तुम्हाला आता हिंदीतील अर्ज डाऊनलोड करता येणार आहेत. तसेच ते हिंदीतून भरून जमा करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. पासपोर्ट सेवा केंद्र आणि क्षेत्रीय पासपोर्ट कार्यालयात भरलेल्या अर्जाची प्रिंट आऊट मात्र स्वीकारली जाणार नसल्याचंही परराष्ट्र मंत्रालयानं सांगितलं आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच परराष्ट्र मंत्रालयाने पासपोर्टसाठी आधार कार्डही जन्मदाखल्याचा पुरावा म्हणून ग्राह्य धरले जाईल, असा अध्यादेश काढला होता. या निर्णयामुळेही पासपोर्ट प्रक्रिया सोपी होण्यास मदत झाली आहे. पासपोर्ट अधिनियम 1980 नुसार 26 जानेवारी 1989 या दिवशी किंवा त्यानंतर ज्यांचा जन्म झालाय, त्यांना पासपोर्टसाठी जन्म दाखला सादर करणं सक्तीचे होते. मात्र, सुधारित नियमांनुसार आता परराष्ट्र खात्याने आणखी काही पर्याय दिले असून, जन्म दाखल्यामुळे निर्माण होणाऱ्या अडचणी दूर होण्यास मदत होणार आहे.