शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का; राज ठाकरेंचा नाशिकमधील विश्वासू शिलेदार फोडला
2
भाषण करताना सुरू झाला पाऊस, निवडणुकीचा निकाल चांगला लागणार, शरद पवारांचं विधान
3
"...अन् दुसऱ्याच दिवशी भाजपात गेले"; शरद पवारांनी सांगितला संजय पाटलांचा इतिहास
4
गुजरातच्या पोरबंदर किनाऱ्यावर 700 किलो ड्रग्ज जप्त, NCB आणि नौदलाची मोठी कारवाई
5
Mumbai Metro 3 Fire BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
6
“राहुल गांधींच्या सभांना प्रचंड प्रतिसाद, PM मोदींचं रिकाम्या खुर्च्यांना संबोधन”: चेन्नीथला
7
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा
8
एकदम कडक! WhatsApp वर येणार दमदार फीचर; मेसेजची 'ही' मोठी समस्या होणार दूर
9
Raamdeo Agrawal on Share Market : शेअर बाजारातील घसरणीचा टप्पा हा तात्पुरता, परदेशी गुंतवणूकदार बाजारात परतणार : रामदेव अग्रवाल
10
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
11
विधेयक फाडलं अन् संसदेत केला आगळावेगळा डान्स; महिला खासदाराचा व्हिडिओ व्हायरल
12
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
13
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
14
तिसरी बार, १०० पार; भाजपाला 'ही' हॅटट्रिक जमेल? नेमकं कसं आहे समीकरण
15
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
16
"लादीवर झोपवायचे म्हणता, तुमच्या वडिलांना विचारा, तेव्हा...;" रामदास कदम यांची आदित्य ठाकरेंवर जहरी टीका 
17
श्रद्धा वॉकर हत्याकांडातील आरोपी आफताब बिश्नोई टोळीच्या हिटलिस्टवर, तिहार प्रशासन सतर्क
18
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
19
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...

बँकांद्वारे वेतनाबाबत वटहुकूम लागू

By admin | Published: December 30, 2016 12:42 AM

रोजंदारी कामगारांचे वेतन बँकांद्वारे करण्यास परवानगी देणाऱ्या वटहुकुमावर राष्ट्रपतींनी स्वाक्षरी केली आहे. बँकांद्वारे वेतन करणे बंधनकारक असलेल्या उद्योग

नवी दिल्ली : रोजंदारी कामगारांचे वेतन बँकांद्वारे करण्यास परवानगी देणाऱ्या वटहुकुमावर राष्ट्रपतींनी स्वाक्षरी केली आहे. बँकांद्वारे वेतन करणे बंधनकारक असलेल्या उद्योग आणि व्यवसायांची सूची जारी करण्याचा अधिकार राज्य आणि केंद्र सरकारला या वटहुकुमाद्वारे मिळाला. केंद्र सरकारने २८ डिसेंबर रोजी हा वटहुकूम जारी केला आहे. वेतन बँकेद्वारेच करण्याचे बंधन मात्र वटहुकुमामध्ये नाही. इच्छा असल्यास कंपन्या अजूनही रोखीने वेतन देऊ शकतात. १९३६ सालच्या वेतन कायद्यानुसार बँकेद्वारे वेतन करण्यासाठी कर्मचाऱ्यांची लेखी परवानगी घेणे बंधनकारक आहे. आता असे बंधन राहणार नाही. त्याचवेळी बँकांद्वारे वेतन बंधनकारक असलेल्या उद्योग आणि प्रतिष्ठानांची यादी जारी करण्याचा अधिकार सरकारांना आता मिळाला आहे. यासंबंधीचे विधेयक श्रममंत्री बंडारू दत्तात्रय यांनी १५ डिसेंबर रोजी संसदेत मांडले होते. तथापि, गोंधळामुळे ते मंजूर होऊ शकले नव्हते. त्यामुळे वटहुकूम जारी करण्याचा पर्याय सरकारने निवडला. नोटाबंदीमुळे देशात चलन तुटवडा निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर वेतन रोखले जाऊ नये म्हणून बँकाद्वारे वेतन करण्याचा पर्याय उपलब्ध होणे आवश्यक होते. त्यानुषंगाने वटहुकूम जारी करण्यात आला होता. (लोकमत न्यूज नेटवर्क)- पेमेंट आॅफ वेजेस (सुधारणा) वटहुकुमाला २0१६ ला राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी मंजुरी दिल्याची माहिती केंद्र सरकारतर्फे देण्यात आली. या वटहुकुमानुसार १८ हजारांपर्यंत वेतन असलेल्या कामगार-कर्मचाऱ्यांना त्यांच्या परवानगीविना बँकेद्वारे वेतन देण्याचा अधिकार कंपन्यांना मिळाला आहे. कंपन्या आता चेकद्वारे अथवा बँक खात्यावर वेतन जमा करू शकतील.